सोनई – माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या वतीने उदयन गडाख यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावलीनिमित्त श्री क्षेत्र देवगड,सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रम,पैस खांब मंदिर,रामनगर,त्रिवेणीश्वर येथे जाऊन संत महंतांचा सन्मान केला.
या प्रसंगी ह.भ.प. गुरुवर्य भास्करगिरी महाराज, महंत ह.भ.प. प्रकाशानंदगिरी महाराज, ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक, ह.भ.प. देविदास महाराज म्हस्के, ह भ प सुनीलगिरी महाराज, ह.भ.प. रमेशानंदगिरी महाराज यांचा सन्मान करून उदयन गडाख यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. तसेच भास्करगिरी महाराज यांच्या मातोश्री सुरूबाई पेसुडे यांचेही दर्शन घेतले

संतांच्या चरणी नम्र होताना उदयन गडाख म्हणाले, “नेवासा तालुका ही संतांची भूमी आहे. संतांचे आशीर्वाद घेऊन सामाजिक जीवनात काम करण्याची प्रेरणा आम्हाला माजी खासदार यशवंतराव गडाख व माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या कार्यातून मिळाली आहे. साधू-संतांच्या दर्शनाने नवचैतन्य लाभले असून, त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावर सदैव मार्गक्रमण करणार आहोत.”
त्यांनी भगवान दत्तात्रय, किसनगिरी महाराज व उपस्थित संतांचे आशीर्वाद घेत शेतकरी व कष्टकरी जनतेच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली.
या प्रसंगी ह.भ.प. बाळू महाराज कानडे, बाळासाहेब पाटील (संचालक, मुळा सहकारी साखर कारखाना, सोनई), कैलासराव झगरे (सरपंच, जळके बु.), भीमाशंकर वरखडे (उपसरपंच, देवगड), दिगंबर वरखडे, महेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

