नेवासा – युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दि. २८ रोजी सकाळी ११. ३० वाजता राज्यातील वंचित बहुजन आघाडी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते सोनई पोलीस स्टेशनवर निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. सोनई येथील दलित समाजातील संजय नितीन वैरागर या मुलाचे अपहरण करून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. जीवे मारण्याच्या हेतूने त्याच्या पायावरून स्कॉर्पिओ गाडी घालण्यात आली. डोळा धारदार शस्त्राने निकामी करण्यात आला. जातीवाचक शिवीगाळ तसेच क्रूर अत्याचार केल्याबाबत आरोपींना तत्काळ अटक करून मकोका व अँट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी व उपअधीक्षक नीरज राजगुरू यांना वंचित बहुजन आघाडीच्यावतीने निवेदन देण्यात आले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

