गोगो

तंबाखू ओतून ओढल्याने अमली पदार्थांसारखी नशा

नेवासा – तालुक्यात सध्या व्यसनाचा धोकादायक प्रकार वाढला आहे. गोगो नावाचा साधा दिसणारा रिकामा सिगारेट कागद (रोलिंग पेपर), तरुण मुलांच्या आयुष्यात काळोख पसरवत आहे. दिसायला आकर्षक वाटणारा हा पेपर, तरुण पिढीला व्यसनाच्या खोल गर्तेत ओढत आहे. या पेपरचा वापर अमली पदार्थांसाठी होत होता, पण आता यात सिगारेटची तंबाखू भरून ओढल्यानेही अमली पदार्थांसारखी तीव्र नशा येते. त्यामुळे या पेपरचे आकर्षण तरुण पिढीत वाढले आहे.

या गोगो पेपरचा धोका दुहेरी आहे. हा कागद तयार करताना तो हळू जळावा म्हणून त्यात क्लोरीनसह अनेक विषारी रसायने मिसळली जातात. जेव्हा यात तंबाखू गुंडाळून ओढली जाते, तेव्हा तंबाखूचे विष आणि या रसायनांचा विषारी धूर एकत्र होऊन शरीरात जातो आणि अमली पदार्थांसारखी तीव्र नशा निर्माण होते. हा धूर सिगारेटपेक्षा कितीतरी पटींनी अधिक घातक ठरतो आणि फुफ्फुस, घसा, मेंदू यांचे मोठे नुकसान करतो. काही क्षणांची नशा होते पण आयुष्याचे वाटोळे होते.

गोगो

हा पेपर तालुक्यातील पान टपऱ्यांवर सहज
उपलब्ध आहे. विक्रेते दोन ते अडीच रुपयांचा हा पेपर थेट दहा रुपयांना विकून मोठा नफा कमवत आहेत. विक्रेते हा फक्त कागद आहे असं सांगून जबाबदारी झटकतात, त्यामुळे प्रशासनालाही कारवाई करणे अवघड होते. याचा कायदेशीर फायदा घेत तरुण पिढी या व्यसनात अडकत आहे.

पालकांनी, या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. मुलांच्या हातात दिसणारा साधा कागद त्यांच्या भविष्याचा नाश करू शकतो. प्रशासनानेही तातडीने कठोर निर्णय घेऊन या कागदाच्या विक्रीवर बंदी घालावी आणि तरुण पिढीला या रासायनिक नशेच्या जाळ्यातून वाचवावे.

newasa news online
गोगो

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गोगो
गोगो

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गोगो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *