गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील अपघातात एका २५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. २० रोजी बिरसाय उदयसिंग मडावी रा. कोसमी सावरगाव व आरती नानाजी कोवा असे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच ३३ ए ई ७५६५ यावरून दिपावली सणानिमित्त त्यांचे गावी अहिल्यानगर ते छत्रपती संभाजी नगर या हायवे रोड वरुन जात असताना घोडेगाव शिवारातील ठोंबळ वस्ती जवळ असलेल्या एका हाॅटेल समोर रोडवरील खड्ड्यात दुचाकी आदळून त्या वरील आरती या रस्त्यावर खाली पडल्या त्याच वेळी मागील बाजूने आलेला मालवाहू ट्रक चे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्या जागीच मयत झाल्या.

दि २८ रोजी सोनई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादी वरुन अज्ञात ट्रक चालका विरुद्ध गुन्हा र. नं. ३९५/२०२५ बिएन एस चे कलम १०६,१२५(अ) (ब), मोटार वाहन कायदा कलम १८४,१३५(अ), १७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार मच्छिंद्र आडकित्ते हे करत आहेत.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

