आम्ही नेवासकर न्यूज अपडेट:- प्रतिनिधी श्री नाथाभाऊ शिंदे पाटील
शेत व शिव पानंद रस्ता करिता सीमांकन हद्दी खुणा निश्चित करून सांकेतिक क्रमांकाचे नंबर देऊन सर्व रस्ते अतिक्रमण मुक्त व मजबूत करणे बाबतच्या आलेल्या जी.आर.प्रमाणे तातडीने अंमलबजावणी करणार :- जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया
नुकताच 29 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या शासन निर्णय महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक :-लवेसू- 2025/ प्र. क्र. ४५८/ भूमापनल-१ दिनांक 29 ऑगस्ट 2025 नुसार राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतामध्ये जाण्यासाठी शेत रस्ता व शिव पानंद रस्ता संदर्भात सीमांकन करणे बाबतच्या सूचना तहसील कार्यालयाला दिलेले आहेतच सेवा पंधरवडा निमित्त एक तातडीने उपायोजना करण्यात आली होती ती कायम निरंतर पुढे करण्यात येणारच आहे असेही जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया साहेब यांनी सांगितले

तसेच ग्रामीण शेत रस्ता समित्या तालुकास्तरीय शेत रस्तासमित्या जिल्हाधिकारी स्तरीय शेत रस्ता समित्या लवकरच स्थापन करण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले
तहसीलदारांनी निकाल दिल्यानंतर 143 52 ची प्रकरणाबाबत न्यायालयाकडे अपील केले जाते याबाबत जिल्हा न्यायाधीश श्रीमती शेंडे मॅडम यांच्याशी लवकरच चर्चा करणार आहे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले
गाव शिवार फेरी घेऊन शेत रस्त्यांची सीमांकन हद्दी करण्याचे काम तातडीने पूर्ण करणार असे आश्वासन यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिले यावेळी महाराष्ट्र राज्य शेत शिवपालन रस्ता चळवळीचे प्रणेते व अध्यक्ष श्री शरद राव पवळे व चळवळीचे उपाध्यक्ष श्री नाथाभाऊ शिंदे पाटील पत्रकार श्री विनोद गोळे, व श्री अरविंद चव्हाण, विठ्ठल निर्मळ यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया साहेब यांना शेत रस्ता सीमांकन कार्यपद्धतीला मुदतवाढ द्यावी असे मागणीचे निवेदन नुकतेच 27 ऑक्टोबर 25 रोजी सादर केले

यावेळी महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद रस्ता चळवळीचे उपाध्यक्ष श्री नाथाभाऊ शिंदे पाटील, प्राचार्य डॉक्टर लक्ष्मण मतकर नेवासा तालुक्यातील बाळासाहेब थोरात माका कानिफनाथ कदम प्रशांत चौधरी, कैलास दहिफळे रामदास तनपुरे मांडवे नगर प्रकाश गुलाब देवकाते साकुर जांबुत संगमनेर बाजीराव शंकर जगदाळे पारनेर हरिभूतवर उषा हुके, सदाजी आईनं रावसाहेब पंडित रमेश भक्त अनिल सरोदे कुकाना गोपीनाथ लोंढे सिद्धार्थ दहातोंडे प्रतीक ठोंबरे साहेबराव आखाडे जानको रुपनर बाबासाहेब मकासरे पत्रकार विनोद गोळे साहेब मिरची विठ्ठल निर्मळ देविदास शिंदे भुशी पाथर्डी कृष्णादास सुदाम जठार संगमनेर विठ्ठल करमळ सुभाष शेळके वाडेगव्हाण पारनेर, श्रीयुत वाळे मंगळापुर संगमनेर इत्यादी अहिल्यानगरची जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

 
                     
                    