चालु गळीत हंगामासाठी प्रती टन तीन हजार रुपये पेमेंटचा निर्णय
सोनई – मुळा कारखान्याने सन २०२६-२७ च्या गळीत हंगामात १५ लाख टन गळीताचं उद्दिष्ट ठेवलं असून त्याची पूर्वतयारी म्हणून ऊस उत्पादन वाढीसाठी ३० कोटीची प्रोत्साहन योजना माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी जाहीर केली. तसेच चालू हंगामात कार्यक्षेत्रातून गळीताला येणाऱ्या ऊसाला प्रती टन ३ हजार रुपये पेमेंटची घोषणा त्यांनी केली. मुळा कारखान्याच्या मंगळवारी झालेल्या मुळा कारखान्याचे संस्थापक व जेष्ठ नेते यशवंतरावजी गडाख यांच्या प्रमुख ऊपस्थितीत झालेल्या मूळा कारखान्याच्या ४८ व्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.
आपल्या प्रमुख भाषणात गडाख म्हणाले की चालू वर्षी १ नोव्हेंबर पासून कारखाने चालू करण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आज आपण मुहूर्ताची पूजा म्हणून हा मोळीचा कार्यक्रम ठेवला. ऊस तोडणीची यंत्रणा हजर झाली असून काही रस्त्यात आहे. १ तारखेपासून रेग्यूलर पूर्ण क्षमतेने म्हणजे ८५०० ते ९००० टनाने आपलं गाळप सुरू होईल.
चालू वर्षी मुळा, भंडारदरा, निळवंडे व जायकवाडी ही सर्व धरणे भरली आहेत. ऊस पिकासाठी अत्यंत पोषक वातावरण आहे. त्याचा फायदा घेतला पाहिजे. 

पुढच्या वर्षीचा २०२६-२७ चा हंगाम हा मोठा हंगाम राहील. १५ लाख टन गळीताचे उद्दिष्ट असल्याचे सांगून त्याची पूर्वतयारी म्हणून ३० कोटीची ऊस उत्पादन वाढीची प्रोत्साहन योजनाही गडाख यांनी जाहीर केली.
प्रोत्साहन योजनेनुसार शेतकऱ्यांना नवीन लागणी करण्यासाठी एकरी ८ हजाराचं बेणं आणि ६ हजार रुपयांचं खत उधारीवर पुरवण्यात येईल. कारखान्याने निवडलेल्या बेणे प्लॉटमधून हे बेणे पुरवलं जाईल. या योजनेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी सविस्तर अटी शर्तीसाठी कारखान्याच्या गट ऑफिसची संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.
या हंगामात आपण भरपूर लेबर भरलं आहे. सुरुवातीपासून पुरेशा गाववार टोळ्या सुरु होतील. ऊसाच्या तोडी वेळेवर होतील. या हंगामात कार्यक्षेत्रातुन गळीताला येणाऱ्या ऊसाला प्रति टन ३००० रुपये पेमेंट करण्यात येईल असं मी जाहिर करुन कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादकांनी मुळा कारखान्यालाच ऊस द्यावा असे अवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संचालक नारायणराव लोखंडे व बबनराव दरंदले तसेच कर्मचारी आदीनाथ केदार व बापूसाहेब तांबे यांनी सपत्नीक गव्हाणीची विधीवत पुजा केली. कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. 

याप्रसंगी मुळा कारखान्याच्या प्रदिर्घ सेवेतून निवृत्त झालेल्या ४० कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच भारतीय शुगर या संस्थेमार्फत उत्कृष्ट शेतकी अधिकारी म्हणून दिलेल्या पारितोषिकाबद्दल शेतकी अधिकारी विजय फाटके यांचा सन्मान करण्यात आला. अध्यक्ष कडूबाळ कर्डिले, ज्ञानेश्वर मंदिराचे विश्वस्त कैलास जाधव, सुभाष दरंदले, आम आदमी पार्टीचे राजू आघाव, बाळकृष्ण भागवत तसेच आश्रू सानप यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला सर्व संचालक तसेच नंदकुमार पाटील, रामभाऊ जगताप, काकासाहेब गायके, विश्वासराव गडाख, दिलीपराव मोटे, उदयन गडाख, कैलास झगरे, दत्तात्रय काळे, अजित मुरकुटे, अझर शेख,लक्ष्मण जगताप, नानासाहेब रेपाळे, राजहंस मंडलिक, राजेंद्र सानप, मंजाबापू भांगे, लक्षाधीश दानी, भगवान शेजुळ, अशोक मंडलिक, बाळासाहेब नवले, नानाभाऊ नवथर, अजय रिंधे, तुकाराम शेंडे, प्रभाकर कोलते, तुकाराम शेंडे, सिताराम झीने, माणिकराव होंडे, भाऊसाहेब निमसे, अशोक येळवंडे, संजय नागवडे, शिवाजी पाठक, बाळासाहेब तनपुरे, रावसाहेब कांगणे, दादासाहेब शेळके, बाबासाहेब जगताप, अनिल अडसुरे, संभाजी आगळे, ऋषिकेश काळे, अशोक हारदे, सुरेश राजमाने, मदन डोळे, फारूक अत्तार, महादेव तांदळे यांचेसह कार्यक्षेत्रातून मोठ्या प्रमाणात सभासद व ऊस उत्पादक शेतकरी तसेच ऊस तोड वहातुक मुकादम व कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी कारखान्याचे अधिकारी शंकरराव दरंदले, व्ही.के.भोर, टी.आर.राऊत, योगेश घावटे, संजय टेमक, वर्क्स मॅनेजर एच.डी.पवार, शेतकी अधिकारी विजय फाटके, चिफ इंजिनिअर डी.बी.नवले, चिफ केमिस्ट एच.डी.देशमुख, डिस्टिलरी मॅनेजर बाळासाहेब दरंदले हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व समारोप कारखान्याचे सचिव रितेश टेमक यांनी केले.

अतिवृष्टीमुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना पीक कसे उभे करायचे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला होता.
शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन खते,व ऊस बेणे
कारखाना देण्याची योजना माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी
जाहीर करून शेतकऱ्यांना आधार दिल्याबद्दल
शेतकऱ्यांनी माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे आभार मानले
ऊस भावात मुळा कारखाना आघाडीवर राहील – यशवंतरावजी गडाख
याप्रसंगी ज्येष्ठ नेते व कारखान्याचे संस्थापक यशवंतरावजी गडाख यांचे भाषण झाले ते म्हणाले सुरुवातीला कार्यक्षेत्र छोटं होतं, ते वाढवलं, विकासाच्या योजना राबवल्या, शंकररावांनी उधारीवर बेणे व खतं दिली. सुधारित जाती लावल्या, साडेबारा टक्के रिकव्हरी मिळाली, उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाची तीन बक्षीसही मिळाली, प्रसंगी पाण्यासाठी आंदोलनं केली, ऊसाचे क्षेत्र वाढलं, वेळेत गळीत व्हावं म्हणून त्यांनी कारखाना मोठा केला, इथेनॉलचा प्रकल्प आणला, पण ऊस पेमेंट मधून ठेवी घेतल्या नाहीत. स्व-भांडवल व कर्जातून प्रकल्प उभारले, त्यामुळे थोडा ताण निर्माण झाला, पण बऱ्यापैकी कर्ज कमी झाले आहे. एनसीडीसीचे कर्जही मंजूर झाले आहे. येणारा काळ चांगला राहील, ऊसाचा भावही जाहीर केला आहे. पुढच्या वर्षासाठी ऊस वाढीची योजना जाहीर केली आहे तिचा फायदा घ्या, पण थोड्याशा मोहासाठी इकडे तिकडे जाऊ नका. घर चालवतानाही एखादा वर्ष अडचणीचे येतं. पण म्हणून काही कोणी घर बदलवत नाही शेवटी आपलं ते आपलंच असतं असं सांगून गडाख म्हणाले की येणारा काळ निश्चितच चांगला राहील ऊस भावात मुळा कारखाना कुठे कमी पडणार नाही हा शब्द आपल्याला देतो असे सांगुन सगळा ऊस मुळा कारखान्याला द्या असे अवाहन त्यांनी केले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

 
                     
                    