पोलीस


गणेशवाडी –19 ऑक्टोबर रोजी सोनई येथे मारहाणीची घटना घडली होती.या घटनेतील दाखल असलेल्या खोटे गुन्हे मागे घेण्या संदर्भात सोनईगावतील व्यापारी व ग्रामस्थ यांच्यावतीने सोनईत दुपारपर्यंत कडकीत बंद ठेऊन सोनई पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चा मध्ये सोनईतील व्यापारी वर्ग, महिला,तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सकाळी अकरा वाजता सोनई सोसायटीच्या प्रांगणातून मोर्चाला सुरवात झाली. छत्रपती शिवाजी चौक, महावीर पेठ, हलवाई गल्ली, बस स्थानक ते राहुरी रोड पोलीस ठाणेवर नेण्यात आला प्रत्येक ठिकानी नागरिक स्वयंपूर्तीने या मोर्चात सहभागी झाल्याने मोर्चाला भव्य स्वरूप आले. मोर्चा मध्ये जवळपास पाच ते सहा हजार नागरिक महिला सहभागी सहभागी झाल्याने राहुरी शनिशिंगणापूर वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.यावेळी मोर्चाचे रूपांतर भव्य सभेत झाले.या सभे मध्ये प्रमुख वक्त्यांनी पोलीस प्रशासनाने खात्री करूनच गुन्हे दाखल करायला हवे होते. समोरच्या प्रवृत्ती कडून व्यापारी व सर्व सामान्य नागरिकांना दमदाटीचे प्रकार घडलेले होते.प्रमुख व्यक्त्यांनी यावेळी त्याचाही निषेध व्यक्त केला.

पोलीस


यावेळी प्रमुख वक्त्यांनी १९ ऑक्टोबर रोजी मारहाण प्रकरणातील संजय नितीन वैरागर उर्फ गोंड्या याच्यावर विविध गुन्हे दाखल असताना सुद्धा तरीपण तो गावात राजरोस फिरत होता. तसेच गावात दहशत निर्माण करून लोकांकडन खंडणी मागत होता.पण पोलीस प्रशासन त्याला अटक न करता झोपेचे सोंग घेतले होते. घटनेच्या दिवशी असाच त्याच्या अतिरेकेला कंटाळून घटनाक्रम झाला काही गुन्हेगारांनी त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांवर अरेरवी केली पोलीस स्टेशनवर दगडफेक केली व पोलिसांवर दबाव आणून जे ग्रामस्थ गावात नव्हते किंवा दुसऱ्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज मध्ये होते हे माहिती असून पण समोरच्यांच्या दबावाला बळी पडून निर्दोष लोकांचे खोटे नावे घेतले व तत्परता दाखवून त्यातील काही जणांना अटक केली गेली.जे घटनेत असतील त्यांच्यावर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी. पण सोनई मध्ये असा नवीन पायंडा पाडू नये तसेच आमच्यातील एक गरीब व्यापारी गणेश चव्हाण हा त्या दिवसापासून आजपर्यंत दवाखान्यात अडमिट आहे.त्याला चांगला मार लागलेला आहे पण प्रशासन त्याचा गुन्हा दाखल करून घेत नाही त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

पोलीस

जर पोलीस स्वतःचे रक्षण करू शकत नसतील व गुंडांना पाठीशी घालत असतील तर अशा प्रशासनाची समाजाला गरज नाही.त्यासाठी याच्यामध्ये सरकारने त्वरित हस्तक्षेप करून एसआयटी स्थापन करून घटनेची चौकशी करावी व चूकीच्या दबावाला बळी पडणाऱ्या पोलिसांवर त्वरित कारवाई करावी. अन्यथा पुढे बेमुदत्त गाव बंद ठेवून आम्ही रस्त्यावर उतरू त्याची जबाबदारी पूर्णपणे पोलीस प्रशासनाची राहील असे यावेळी मोर्चाच्या वतीने निवेदनात म्हटले आहे.

यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख रावसाहेब खेवरे यावेळी पोलीस प्रशासनाला चार दिवसा अवधी देत दाखल केलेले खोटे गुन्हे माघारी नाही घेतले तर घोडेगाव चौफुली येथे भव्य रास्ता रोखो आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
यावेळी सोनई येथील मोर्चात आकाश बेग,लखन जगदाळे, सरपंच कानिफनाथ एळवंडे, अनिल शेटे,राजेंद्र लांडे,श्रुती वने,भाऊसाहेब लांडे, अमोल वांढेकर आदी वक्त्यांनी प्रमुख यावेळी भाषणे केली.

पोलीस

आजच्या मोर्चा प्रसंगी विविध गुन्हातील आरोपीला संजय उर्फ गोंड्या नितीन वैरागर हा राजरोजसपणे सोनई गावामध्ये फिरून व्यापारी व सर्वसामान्य लोकांना खंडणी मागत होता. सोनई बसस्थानक परिसरातील व्यावसायिक गणेश चव्हाण यांच्या दुकानात जाऊन खंडणी मागून त्यांना मारहाण केली. संजय वैरागर याचा सर्वसामान्य नागरिक व व्यापारी यांना खूप त्रास आहे. तरी पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असून पोलिसांचा यामागे आशीर्वाद आहे का? तरी माझ्या पतीला व इतर सहकारी यांना जातीय रंग देऊन खोट्या गुन्हे दखल केले आहेत. हे खोटे गुन्हे मागे घेतले नाहीतर लवकरच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर सर्व ग्रामस्थ व बांधवा बरोबर घेऊन भव्य मोर्चा काढण्यात येईल.
– सौ.श्रुती विशाल वने –सोनई

पोलीस

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पोलीस
पोलीस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पोलीस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *