नेवासा – अॅड. संभाजी पवार यांची मुले ओम पवार व अस्मिता पवार यांनी क्रिकेटमध्ये लक्षवेधी कामगिरी करत नेवासाचा गौरव वाढवला आहे. ओमची ‘१४ वर्षांखालील’ जिल्हा संघात निवड झाली असून, अस्मिता हिने आंतरजिल्हा सामन्यात धारदार गोलंदाजीने ५ फलंदाज बाद केले. या दुहेरी यशाने त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
प्रतिभावान क्रिकेटपटू ओम संभाजी पवार याने उत्कृष्ट फलंदाजी व सर्वांगीण खेळामुळे जिल्हा संघात स्थान मिळवले. दोन वर्षांपूर्वी MCA च्या ‘महाराष्ट्र स्पीड स्टार’ स्पर्धेत त्याची निवड झाली होती आणि त्याला गहूंजे स्टेडियमवर गोलंदाजीची संधी मिळाली होती. ओम ज्ञानदिप इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये इयत्ता ९ वी मध्ये शिकत आहे.

अस्मिता पवार हिने नाशिक येथे झालेल्या आंतरजिल्हा क्रिकेट सामन्यात अचूक लाईन-लेंथच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाचे पाच महत्त्वाचे फलंदाज बाद केले. अस्मिता नेवासा येथील ज्ञानेश्वर महाविद्यालयाची १२ वी सायन्सची विद्यार्थिनी आहे.
ओम पवार यास सुदर्शन क्रिकेट अकादमीचे इम्रान पठाण सर यांचे, तर अस्मिता पवार हिला एस.व्ही. नेट क्रिकेट अकादमीचे शशिकांत निऱ्हाळी सर व इम्रान पठाण सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
पवार बहिण-भावाच्या या यशाबद्दल पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार रोहीत पवार (MCA अध्यक्ष), मा.खासदार सुजय दादा विखे पाटील, आमदार संग्राम भैय्या जगताप, पंचगंगा उद्योगसमूहाचे प्रभाकर शिंदे साहेब, पं.स. उपसभापती किशोर जोजार, बाळासाहेब भदगले, डॉ. करणसिंह घुले,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अशोक मोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन औताडे, संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार, जि.प. सदस्य दिलीप वाकचौरे, अॅड. अंबाडे, अॅड. अशोक करडक, पत्रकार बाळासाहेब देवखिळे, नानासाहेब पवार, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अॅड. गणेश गोंडाळ, निवड समिती प्रमुख अजय कवीटकर सर यांसह अनेक क्रिडा प्रेमींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

 
                     
                    