नेवासा- सोनई (ता. नेवासा) येथील संजय वैरागर यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय लहूजी सेना, नवबौद्ध आणि आंबेडकर चळवळीतील संघटनांनी भेंड्यात बुधवारी (दि.२९) रास्ता रोको आंदोलन केले.
भेंडा येथील बस स्थानक चौकात अर्धा तास झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे शेवगाव आणि नेवाशाकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. आंदोलनात सागर शिरसाठ, स्वप्निल सोनकांबळे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष श्याम सोनकांबळे, अखिल भटका जोशी समाज संघटनेचे दादासाहेब गजरे, हनीफ पठाण, लहुजी सेनेचे प्रमुख सुरेश आढागळे, जालिंदर आरगडे, बाळासाहेब बागुल यांनी मनोगत व्यक्त करताना या घटनेतील उर्वरित आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

