नेवासा- श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, नेवासा तालुक्यातील खडका फाटा येथील ‘साई लॉजिंग’ या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध कुंटणखान्यावर (दि. २९ ऑक्टोबर) रोजी सकाळी पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे.
या कारवाईत पोलिसांनी हॉटेल मालक बाळासाहेब भानुदास जाधव (वय २५) (रा. मक्तापूर, ता. नेवासा) आणि हॉटेल मॅनेजर विकास योगेश उर्फ यहुबा औताडे (वय २५) (रा. मक्तापूर, ता. नेवासा) या दोन मुख्य आरोपींना तात्काळ अटक केली. तसेच, हॉटेल रूम्समधून तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

अहिल्यानगर- संभाजीनगर महामार्गावरील खडका फाटा येथील साई लॉजिंगमध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशाचे आमिष दाखवून देहव्यापारास प्रवृत्त करणाऱ्या या आरोपींवर कारवाई करण्यासाठी, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर कार्यालयातील पोलीस पथकाने नेवासा पोलीस ठाण्याचे पो.नि. महेश पाटील यांच्या मदतीने सापळा रचला. त्यांनी दोन पंचांना व महिला पोलीस अधिकाऱ्यांना सोबत घेऊन एका खाजगी इसमास बनावट ग्राहक म्हणून पाठवले. वेश्याव्यवसाय चालू असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकून ही कारवाई केली.
या प्रकरणी पो.ना. संदीप दरंदले यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्र. ९१७/२०२५ अन्वये (पीटा)कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे व अपर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, या पथकात पो.नि. महेश पाटील, म.पो.स.ई. श्रद्धा वैद्य, मपोकॉ वर्षा कांबळे, पो.हे.कॉ. दादासाहेब लोंढे, पो.ना. संदीप दरंदले, पो.कॉ. राजेंद्र विरदवडे आणि पो.कॉ. सहदेव चव्हाण यांचा समावेश होता. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. महेश पाटील हे करीत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

 
                     
                    