नेवासा – महाराष्ट्र राज्यात जनावरांसाठी व कांदा मार्केटकरीता सुप्रसिद्ध असलेला बाजार म्हणून घोडेगाव ओळखले जाते. छत्रपती संभाजीनगर – अहिल्यानगर महामार्गावर असलेल्या घोडेगावची ओळख आहे. महाराष्ट्र शासनाने ग्रुप ग्रामपंचायतमध्ये बाजाराची झापवाडी हद्दीमध्ये याची नोंद होती. राज्य शासनाने आता हा बाजार घोडेगावला मंजूर केला असल्याची माहिती फुले शाहू आंबेडकर चळवळीतील बहुजन नेते सुधीर वैरागर यांनी दिली.

वैरागर यांनी सांगितले,घोडेगाव झापवाडी ग्रुप ग्रामपंचायत विभाजनामध्ये घोडेगाव बाजारचा महाराष्ट्र शासनाने झापवाडी हद्दीत समावेश केल्याने घोडेगावचे महसुली अस्तित्व संपुष्टात आल्याने मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. महाराष्ट्र शासन सहसचिव अजित देशमुख यांनी घोडेगाव बाजार मंजूर केल्याची शासकीय अधिसूचना घोषित केली आहे. घोडेगावचे ग्रामदैवत घोडेश्वरीच्या नावाचा बाजारचा घोडेगाव महसुली हद्दीत समावेश कामी केलेल्या प्रयत्नांना आलेलं यश कुटुंबातील व्यक्तींच्या मंगल चरणावर समर्पित आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

