नेवासा – सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीनंतर काल पुन्हा कौठा, रस्तापूर, फत्तेपूर, चांदा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने उरलेसुरल्या पिकांचेही नुकसान झाले. कपाशीचे नुकसान झाल्याने यावर्षी शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी आणी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे. नेवासा तालुक्यातील चांदा महसूल मंडलात काल जोरदार पाऊस झाला. उरलेसुरलेले पीक पूर्ण जमीनदोस्त झाले आहे. यामध्ये कापसाच्या वाती झाल्या आहेत.

थोडाफार फुटलेला कापूस आणि अन्य काही पिके बुध बुधवारी सकाळी २-३ तास पाऊस झाल्याने नष्ट झाली आहेत. मागील अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळण्यापूर्वीच पुन्हा परतीच्या पावसाने तडाखा दिल्याने शेतकरी पुर्णपणे कोलमडून गेला आहे. राज्य सरकारने
कौठा परिसरात झालेल्या पावसाने कपाशीचे मोठे नुकसान झाले.
आठ दिवसात भरपाई न दिल्यास शेतकरी रस्त्यावर येतील असे काही शेतकऱ्यांनी सांगितले. गेल्या दोन महिन्यांपासून अतिवृष्टी सततचा पाऊस यामुळे शेतीतील पाणी अजूनही कमी होत नसल्याने मशागती रखडल्याने रब्बी हंगाम पूर्व तयारीचे कामे ठप्प झाली आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

 
                     
                    