नेवासा – घर बांधण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये व गृहपयोगी वस्तू आणाव्यात, या मागणीसाठी २१ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी, पतीसह सासरच्या पाच -जणांविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुळ महालक्ष्मी हिवरे (ता. नेवासा) व सध्या जेऊर बायजाबाई (ता. अहिल्यानगर) येथे राहत असलेल्या पीडिताने बुधवारी (२९ ऑक्टोबर) फिर्याद दिली आहे.

भालेराव, सासु सविता विष्णु भालेराव, सासरा विष्णु कमळाकर भालेराव, दीर पती अजित विष्णु अभिजित विष्णु भालेराव (सर्व रा. महालक्ष्मी हिवरे), आजी सासु आशाबाई अशीक तुमलोंढे (रा. जामगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. फिर्यादीचा विवाह अजित भालेराव याच्याशी झाला होता. ७ एप्रिल २०२५ ते २४ एप्रिल २०२५ दरम्यान, संशयित आरोपींनी संगनमत करून फिर्यादीकडे घर बांधण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये व गृहपयोगी वस्तू आणण्यासाठी तगादा लावला. या कारणावरून तिला वेळोवेळी उपाशीपोटी ठेवण्यात आले, शिवीगाळ व दमदाटी करून शारीरिक व मानसिक छळ केला. पती अजित याने फिर्यादीस मारहाण केली. पैसे व वस्तू आणल्या नाहीत, तर तुला जिवे मारून टाकू, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अंमलदार महमंद शेख अधिक तपास करीत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

 
                     
                    