नेवासा – नेवासा तालुक्यातील विविध प्रसिद्ध देवस्थानांच्या विकासासाठी तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहीती आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिली.
आ. लंघे म्हणाले की, प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत नेवासा तालुक्यातील विविध प्रसिद्ध देवस्थानांच्या विकासासाठी तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

संतभूमीचा सर्वांगीण विकास धार्मिक पर्यटनातून साधता येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
अजितदादा पवार तसेच पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांचे आभार व्यक्त केले.
तुळजाभवानी माता व हनुमान मंदिर देवस्थान (खामगाव), विठ्ठल-रुक्मिणी अध्यात्मिक केंद्र (गोणेगाव चौफुला), जगदंबा माता देवस्थान शिरसगाव, हनुमान मंदिर (बेलपिंपळगाव), श्रीदत्त सीनाई देवस्थान (भानसहिवरे), महालक्ष्मी मंदिर संस्थान (वरखेड), खंडोबा मंदिर (म्हाळसा माहेर), सचितानंद बाबा (ज्ञानेश्वरी लेखक) व नारद मुनी मंदिर देवस्थान नेवासा बुद्रुक या देवस्थानांसाठी हा निधी मिळाला आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

 
                     
                    