गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील गणेशवाडी ते सोनई रस्ता सध्या साक्षात यमलोकात जाण्यासाठी चा मार्ग अर्थात मृत्युचा सापळा बनला आहे. नवीन रस्ता केला नंतर संबधित ठेकेदाराला तो रस्ता दुरस्ती करीता दोन वर्षे दिलेली असतात. त्यामध्ये जर तो खराब झाला तर ते दुरस्ती चे काम संबंधित ठेकेदाराचे असते. परंतु एकदा पण या रस्त्यावर डागडुजी केली गेली नाही. साध्या साईड पट्या देखील भरल्या गेल्या नाही , पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी कुठलीही सुविधा केली नाही. आधीच हा पाच किलोमीटर असलेला रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा बनवला होता. ठेकेदाराने अधिकाऱ्यांना पैसे देऊन आपले उकळ पिवळे केले. हेच आतापर्यंत घडत आले आहे.

यावर कुणाचाही वचक न राहील्याने संबंधित ठेकेदाराचे फावले जाते.आता ऊस कारखाने सुरू झाली आहेत. या ठिकाणाहून ऊस वाहतूक करणे म्हणजे साक्षात मृत्युला आमंत्रण देणे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जर या रस्ता चे काम तातडीने झाले नाही तर ऊस गाळपावीना तसाच उभा राहून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.करजगाव, अंमळनेर,निंभारी, वाटापुर, सर्वांसाठी हाच मार्ग सोपस्कर असल्याने नेहमी वर्दळ असते. तेव्हा हा गणेशवाडी ते सोनई पाच किलोमीटर रस्त्याची तातडीने दुरस्ती करण्याची मागणी परिसरातून होत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

 
                     
                    