वल्लभभाई पटेल

नेवासा (ता. नेवासा) — सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आज दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7.00 ते 9.00 या वेळेत नेवासा शहरात “वॉक फॉर युनिटी” हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

या एकता दौडीची सुरुवात गणपती चौकातून झाली व समारोप न्यायालय इमारतीसमोर झाला. कार्यक्रमासाठी नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली 4 पोलीस अधिकारी व 28 पोलीस अंमलदारांनी सुरक्षा व वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी सांभाळली.

वल्लभभाई पटेल

कार्यक्रमात नेवासा तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांचे सुमारे 150 ते 200 नागरिक सहभागी झाले होते. त्यात माजी सैनिक संघटना, पत्रकार बांधव, डॉक्टर्स असोसिएशन, मेडिकल स्टोअर असोसिएशन, होमगार्ड स्टाफ, पोलीस पाटील, व्यापारी संघटना, वकील संघटना, नगरसेवक तसेच प्रतिष्ठित नागरिकांचा सहभाग उल्लेखनीय होता.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून नेवासा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. भोसले साहेब व श्री. मोरे साहेब, तहसीलदार श्री. बिरादार, तसेच गटविकास अधिकारी श्री. लखवाल उपस्थित होते. त्यांनी “वॉक फॉर युनिटी” मध्ये सहभागी होत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचे स्मरण करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

एकता, ऐक्य आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देत सदर कार्यक्रम शांततेत व यशस्वीरीत्या पार पडला.

newasa news online
वल्लभभाई पटेल

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वल्लभभाई पटेल
वल्लभभाई पटेल

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वल्लभभाई पटेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *