खून

नेवासा – गोधेगाव येथे घडलेले व दीर्घकाळ चर्चेत राहिलेले खून प्रकरण अखेर न्यायालयीन प्रक्रियेअंती निकालात आले असून, नेवासा येथील जिल्हा न्यायाधीश-१ श्री. वाघमारे साहेब यांनी आज निकाल देत भूपेंद्र भिंगारदे व इतर आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे.दिनाक २८/११/२०२०रोजी सायंकाळी ५.०० वा. ते सुमारास रस्त्यावर मुरुम टाकण्याचा कारणांमुळे आरोपी व मयत यांच्यामध्ये वाद झाले होते.त्यानंतर दिनांक २९/११/२०२० रोजी आरोपी महेंद्र याने रस्त्यावर मुरुम टाकल्याने मयत व फिर्यादी हे टऱ्ॅक्टरच्या सहाय्याने मुरुम पांगवत असताना आरोपी भुपेंद्र याने कु-हाडीने मयत दत्तात्रय ठोंबरे यांना डोक्यात मारले त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्या अनुशंगाने नेवासा पोलीस स्टेशन ला गु.र.न. ९७८/२०२० हा दिनांक ३०/११/२०२० रोजी भा.द.वी.कलम ३०२,३४१,१४१,१४३,१४७,१३८,१४९,१२०(ब),३२३,५०४,५०६ अन्वये नोंदविण्यात आलेला होता.

खून

सदर प्रकरणाद त्या वेळी भूपेंद्र भिंगारदे यांच्यासह सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.ईतर आरोपी वगळता आरोपी भुपेंद्र काराग्रहात होता. प्रकरणाच्या सुनावणीत साक्षीदारांचे जबाब परस्परविरोधी ठरल्याने आणि घटनेशी संबंधित ठोस पुरावे सादर करण्यात पोलिसांना अपयश आल्याने न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले.

या प्रकरणात आरोपी भुपेंद्र भिंगारदे यांचे वतीने ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. बाबा औताडे,. ॲड.एल. डी. घावटे, ॲड. अच्युत औताडे यांनी कामकाज पाहीले तसेच आरोपी अक्षय भिंगारदे यांचे वतीने ॲड. गंटने पि.एस.यांनी कामकाज बघीतले तर आरोपी महेंद्र व राजेंद्र भिंगारदे यांचे वतीने ॲड. मोरे एम.एन.आणि आरोपी कोमल भिंगारदे यांचे वतीने ॲड. जोशी एन.एस. व ॲड.जोशी व्ही.एन.यांनी कामकाज बघीतले।

newasa news online
खून

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

खून
खून

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

खून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *