उपजिल्हाधिकारी चोरमारे यांच्या नियंत्रणाखाली मोजणी
सोनई- शनिशिंगणापूर देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे व देवस्थानचे सचिव नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांच्या नियंत्रणाखाली शुक्रवारी शनैश्वर देवस्थानचे दानपात्र उघडण्यात आले. या दानपात्रात सुमारे २० लाख ५६ हजार ८७८ रुपयांची रक्कम निघाली.
शनैश्वर देवस्थान येथे दर सोमवारी दानाची मोजणी उदासी महाराज मठामध्ये केली जात होती. आता प्रशासकीय समितीने दर शुक्रवारी मोजणी सुरू केली आहे. दि.३० ऑक्टोबर रोजी शनिशिंगणापूर येथील शनी मंदिरातील उदासी महाराज मठात सकाळी ११ वाजता देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, नायब तहसीलदार तथा देवस्थानचे व्यवस्थापक सचिव राजेंद्र वाकचौरे यांच्या नियंत्रणाखाली व सहायक धर्मदाय आयुक्त यांचे प्रतिनिधीसमोर मोजणी झाली.

यावेळी कार्यकारी समिती सदस्य, देवस्थानचे विभाग अधिकारी व कर्मचारी यांनी सीसीटीव्हीच्या निगराणीखाली दानपात्रातील पैशांची मोजणी केली. शनिशिंगणापूर देवस्थान व मंदिर परिसरात सुमारे १८ दानपेट्या आहेत. सध्या प्रशासकीय कार्यकारी समिती नियुक्त झाली असल्याने उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, नेवासाचे नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांच्या देखरेखी दानपात्र
उघडून दानपात्रातील रक्कम मोजली गेली. दानपात्रात सुमारे २० लाख ५६ हजार ८७८ रुपयांची रक्कम निघाली.
यावेळी शनैश्वर देवस्थानच्या प्रशासकीय कार्यकारी समितीचे सदस्य आशिष शेळके (सहा. पोलीस निरीक्षक), विनायक पाटील (उपअभियंता, बांधकाम), गणेश खेडकर (लेखाधिकारी), राजकुमार पुंड (उपकोषागार अधिकारी), विनायक गोरे (मंडलाधिकारी, घोडेगाव), सतीश पवार (तलाठी, शनी शिंगणापूर), दादासाहेब बोरुडे (ग्रामसेवक, शनीशिंगणापूर) आदी उपस्थित होते. शनैश्वर देवस्थानच्यावतीने कार्यालयीन अधीक्षक लक्ष्मण वाघ, कायदेशीर सल्लागार लक्ष्मण घावटे, सुरक्षाधिकारी जी.बी. दरंदले व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

