लाडक्या बहिणींचा उत्स्फूर्त सहभाग – सामाजिक उपक्रमांनाही मिळाली गती
कुकाणा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) तर्फे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच लाडक्या बहिणींचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
या प्रसंगी अविनाश आदिक यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या हस्ते मोफत KYC आणि आरोग्य कार्ड वितरण उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
कुकाणा येथील अब्दुलभैया जनसंपर्क कार्यालय येथे जिल्हाध्यक्ष कपिलजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
यावेळी आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात चर्चेसाठी आणि राष्ट्रवादी पक्ष ताकदीने मजबूत करण्यासाठी ही आढावा बैठक पार पडली.
बैठकीदरम्यान अब्दुल भैय्या शेख यांच्या विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळूनही त्यांनी महायुती धर्म जोपासल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. उपस्थित कार्यकर्त्यांनी “आता महायुतीने त्यांना योग्य न्याय देऊन त्यांच्या पाठीशी उभे राहावे” अशी मागणी एकमुखाने केली.

अब्दुल शेख यांच्या घरात उमेदवारी द्यावी अशीही मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. त्यांच्या कार्यालयातून गोरगरीब जनतेची कामे नियमितपणे होत असल्याचे पाहून जिल्हाध्यक्ष कपिल पवार भारावून गेले आणि त्यांनी “पक्ष अब्दुल शेख यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील” असा शब्द या वेळी दिला.
निवडणुकांबाबतच्या चर्चेत नगर पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या संदर्भात विविध गटातील कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सातही गटात उमेदवार उभे करण्याची तयारी असल्याचे सांगण्यात आले. चौदा पंचायत समित्यांमध्ये लढण्याची मागणी काही कार्यकर्त्यांनी केली.
अब्दुल शेख यांनी आपल्या भाषणात, “अजित पवार यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम आहे. प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याची ग्वाही आम्ही देतो,” असे सांगितले. तसेच नगर पंचायत निवडणुकीत आदर पूर्वक जागा मिळाल्यास महायुतीच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

या वेळी अशोक मोरे यांनी “नेवासा तालुक्यात राष्ट्रवादीचे घड्याळ येत्या काळात तालुक्याला चांगली वेळ देईल,” असा विश्वास व्यक्त केला आणि खरवंडी गटातून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट केले.
वसंतराव कांगणे (बेलपिंपळगाव गट) आणि बाबासाहेब नवथर (भेंडे गट) यांनीदेखील उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले.
शेवटी जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी “पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत सक्षम उमेदवारांना संधी दिली जाईल. महायुतीने विश्वासात घेतले तर उत्तम; अन्यथा सर्व जागा आम्ही स्वबळावर लढवू,” असे स्पष्ट मत व्यक्त केले.या प्रसंगी अब्दुल शेख यांच्या नेतृत्वाखाली पक्ष जोरदार भरारी घेत असून राष्ट्रवादी अजितदादा गट सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देत आहे गोर गरिबांची सेवा करत आहे. तसेच तालुका अध्यक्ष अशोक मोरे व अब्दुल शेख यांच्यात असलेले एकमत पक्षाला फायदेशील ठरत असल्याचे दिसून आले.

बैठकीचा समारोप “सर्व स्थानिक पदाधिकारी यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेण्यात येतील” या आश्वासनासह झाला. युवा नेते सारंग फोफसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला याप्रसंगी तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थिती होते.
उपस्थित पदाधिकारी:
युवा नेते अब्दुल शेख,तालुकाध्यक्ष अशोकजी मोरे साहेब जस्मिन शेख,
उपाध्यक्ष बाबासाहेब नवथर ,ओबीसी सेल कार्याध्यक्ष विठ्ठल फुलसौंदर
अल्पसंख्यांक अध्यक्ष नाजीम सय्यद
सारंगजी फोपसे ,उपाध्यक्ष वसंत कांगुणे ,सतीशजी गोडसे
भावराव चिंधे,विठ्ठल शेंडे
कामगार सेल प्रदेश उपाध्यक्ष मकरंद राजहंस ,महिलाध्यक्षा अनिताताई देवखिळे ,कार्याध्यक्ष अभय तूवर,उपाध्यक्ष संभाजी जाधव ,युवक तालुकाध्यक्ष अभिराज आरगडे,
कामगार तालुकाध्यक्ष संदीप लष्करे, गणेश चौघुले
ओबीसी सेल अध्यक्ष सचिन दरवडे
मागासवर्गीय सेल अध्यक्ष अमित साळवे.ओबीसी सेल कार्याध्यक्ष गणेश गवळी मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी व पत्रकार बांधव आदी उपस्थित होते. जस्मिन शेख यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

