सोपान परळी काळे राहणार झापवाडी तालुका नेवासा यांच्या सेवापूर्ती समारंभ प्रसंगी देवगड देवस्थानचे गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थित हा सन्मान सोहळा संपन्न झाला…..
हेच आम्हा करने काम बीज वाढवावे नाम या तुकोबारायांच्या वचनाप्रमाणे धर्मचरण करणे म्हणजे धर्माचे रक्षण करणारी जी व्यक्ती या ठिकाणी राहतात देश देव आणि धर्म या तीन गोष्टी अतिशय महत्त्वाचे आहेत ज्यांनी आपले जीवन यासाठी समर्पण केले त्यांचे दोन तप म्हणजे बारा वर्षाचे एक तक 24 वर्षे व 27 महिने सेवा त्यांनी देशासाठी दिली आणि आज त्यांचा हा गुणगौरव सोहळा होत आहे आज हा एक शक्तीचा सोहळा आहे.

मेजर सोपानराव काळे यांच्या निमित्ताने देशाचा स्वाभिमान ही दिसला व धर्म अभिमान हे दिसला या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आपल्या गावचे आराध्य दैवत भगवान शंकराचे मंदिर आपण सुंदर बनवले प्रभू रामचंद्राचे मंदिर हे आपण सुंदर बनवले तसेच या निमित्ताने त्यांनी भूमिदानही केले त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे कार्यक्रम हा फक्त निमित्त आहे मेजर यांच्या निमित्ताने सर्व गावाने एकत्र येऊन सर्व गावाचा गावपणा आपल्या देशाचा व धर्माचा स्वाभिमान ऋत्विग्न होण्यासाठी या कार्यक्रमाची आवश्यकता होती आणि तो सुंदर असेल त्या संपूर्ण झाला त्याचा आम्हाला आनंद होतोय.
बाकीचे सारे हेवेदावे दूर करून आपल्या गावाचा गावपणा जागी ठेवायचा आहे असे देवगड देवस्थानचे महंत ह.भ.प भास्करगिरीजी महाराज हे बोलताना म्हणाले.
यावेळी मेजर सोपान काळे यांच्या समवेत असलेले मेजर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच मेजर सोपान काळे यांना पुढील सेवानिवृत्त जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

ह.भ.प.बाबाजी, ह.भ .प कारभारी महाराज झरेकर, ह.भ.प.दीपक महाराज काळे, देवा दत्तात्रय कुलकर्णी, संतोष वाघ, बाबुशेठ कांदा व्यापारी, भूमी दान करणारे आई-वडील पाराजी काळे, विजया काळे, तसेच समस्त काळे परिवार यांच्या वतीने दीपक महाराज गोशाळा मढी गो शाळेसाठी भूमिदान करण्यात आले.
तसेच यावेळी संत सर्व उपस्थित संत महंतांचे टाळ व मृदंगांच्या जयघोष मध्ये वारकरी संप्रदाय पद्धतीने समस्त गावकऱ्यांनी मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत केले.
यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन तसेच ग्रामपंचायत सदस्य तसेच समस्त ग्रामस्थ बाबाजी सोबत संत सेवक बाळासाहेब महाराज कानडे, आदिनाथ रौंदळ, सोमनाथ कराळे, दिलीप लोखंडे, दुर्योधन सोनवणे, आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

