निधी

आ.लंघे यांची माहिती; विविध कामे लागणार मार्गी

नेवासा- नेवासा शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून नेवासा नगरपंचायत क्षेत्रातील विकास कामांसाठी ५ कोटी रुपयांचा मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार विठ्ठलराव लंघे यांनी ही माहिती दिली असून, या निधीमुळे नेवासा शहराच्या विकासासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे.

नेवासा नगरपंचायत विकास योजना सन २०२५-२६ अंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला असून, या अंतर्गत प्रामुख्याने रस्ते विकास आणि पर्यटन विकासाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या निधीतून मंजूर झालेल्या महत्त्वाच्या कामांची यादी प्रभाग-३ दहातोंडे घर ते संतोष गाढवे घरापर्यंत रस्ता करणे ५२ लक्ष, श्री क्षेत्र ज्ञानेश्वर मंदिर रोड (जुना पालखी मार्ग) ते कहार वस्ती ते गणपती मंदिर भराव पर्यंत रस्ता करणे ९० लक्ष, मधमेश्वर मंदिर ते खडका रोड पर्यंत रस्ता करणे ७६ लक्ष,

निधी

प्रभाग-७श्रीरामपूर रोड ते आरेकर हॉस्पिटल व सरकारी धान्यगोडाऊन ते गणपती मंदिर पर्यंत रस्ता करणे २६ लक्ष, प्रभाग-१ मामा भांजे गॅरेज ते नगरपंचायत विहीर पर्यंत रस्ता करणे १२ लक्ष, प्रभाग-१७रासने घर ते घोरपडे घर ते भालसिंग वस्ती रस्ता करणे ९१ लक्ष, चिंचबन रोड ते व्यवहारे वस्ती जिल्हा परिषद शाळे पर्यंत रस्ता करणे ६० लक्ष, प्रभाग-३ ननवरे घर ते इनामदार घर ते पारखे पर्यंत रस्ता करणे २७लक्ष, प्रभाग १७ ललिता गायकवाड घर ते दिलीप कराळे घरा पर्यंत रस्ता करणे ३० लक्ष, प्रभाग ७ दीपक शिंदे घर यांचे राजेंद्र परदेशी यांच्या घरापर्यंत रस्ता करणे २४ लक्ष, प्रभाग १० निखील जोशी घर ते राजेंद्र पानसरे घरा पर्यंत रस्ता करणे १२ लक्ष असे एकूण ११ कामे ५ कोटीची समावेश आहे.

या विकास निधीमुळे शहरातील नागरिकांच्या अनेक मूलभूत गरजा पूर्ण होतील आणि रस्त्यांच्या सुधारणेमुळे दळणवळण अधिक सोपे होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या माध्यमातून नेवासा शहराच्या विकासाला मोठा हातभार लागल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

निधी
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

निधी
निधी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

निधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *