नेवासा- तालुक्यातील पुनतगाव येथे घडलेल्या घरफोडीचा छडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लावला आहे. या कारवाईत एक आरोपीला अटक करण्यात आली असून, दोघे साथीदार फरार आहेत. चोरीस गेलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळविण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत पुनतगाव येथील नंदराज दगडु शिदे (वय ६३) यांच्या घराच्या मागील दरवाजातून अज्ञात चोरट्याने प्रवेश करून कपाटातील सुमारे ३ लाख ८८ हजार रुपयांचा सोन्याचा आणि रोख मुद्देमाल चोरून नेला होता. या घटनेबाबत नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कवाडी यांना विशेष सूचना दिल्या. त्यानुसार सपोनि हरिष भोये यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार फुरकान शेख, दीपक घाटकर, बाळासाहेब नागरगोजे, रिचर्ड गायकवाड, सोमनाथ झांबरे, किशोर शिरसाद, बाळासाहेब खेडकर, प्रशांत जाधव तसेच महिला अंमलदार भाग्यश्री भिडे आणि ज्योती शिदे यांचे पथक तयार करण्यात आले.

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पथकाला माहिती मिळाली की, हा गुन्हा सचिन उर्फ काळ्या भाऊसाहेब काळे (वय २२, रा. लखमापुरी, ता. शेवगाव) या इसमाने त्याच्या साथीदारासह केला आहे. पथकाने तातडीने शेवगाव येथे छापा टाकून सचिन काळे यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने कबुली दिली की हा गुन्हा त्याने आणि त्याचा साथीदार राहुल शिरसाठ भोसले (रा. पिंपळवाडी, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर -फरार) यांनी मिळून केला. त्यांनी चोरीसाठी होंडा एस.पी. मोटारसायकलचा वापर केल्याचेही सांगितले.
पुढील चौकशीत स चिन काळे याने चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्रीसाठी लखन विजय काळे (रा. शेवगाव – फरार) याचेकडे दिल्याचे उघड केले. सध्या दोन्ही फरार आरोपींचा शोध सुरू असून, अटक आरोपी सचिन काळे यास नेवासा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार आणि पो.नि. किरणकुमार कवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. पुढील तपास नेवासा पोलिस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

