नेवासा- मेडिकल असोसिएशनची नवीन कार्यकारिणी नुकतीच सर्वानुमते निवडण्यात आली. अध्यक्षपदी शहरातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. किशोर गळनिंबकर (ऑर्थोपेडिक सर्जन) यांची निवड करण्यात आली आहे. पदभार हस्तांतरण समारंभ वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्ष डॉ. गणेश नांदे, प्रदीर्घ रुग्णसेवेसाठी ओळखले जाणारे वैद्यकीय अधिकारी, सचिव डॉ. निर्मला सांगळे, धडाडीच्या महिला प्रतिनिधी, संयुक्त सचिव डॉ. संतोष सोनवणे (दंतरोगतज्ज्ञ) तसेच खजिनदार डॉ. संदीप देशमुख (बालरोगतज्ज्ञ) अशी निवड करण्यात आली.
खेळ व सांस्कृतिक विभागात – डॉ. शंकर वंजारी (क्रीडा प्रमुख), डॉ. वरुण देवरे (भ्रमंती व गड-किल्ले विशारद), डॉ. एरंडे (दंतरोगतज्ज्ञ), डॉ. भाग्यश्र कीर्तने (रेडिओलॉजिस्ट) व डॉ. अश्विनी साळुंद यांचा समावेश आहे.

(क्रीडा प्रमुख), डॉ. वरुण देवरे (भ्रमंती व गड-किल्ले विशारद), डॉ. एरंडे (दंतरोगतज्ज्ञ), डॉ. भाग्यश्री कीर्तने (रेडिओलॉजिस्ट) व डॉ. अश्विनी साळुंके यांचा समावेश आहे.
कोर कमिटी सदस्य म्हणून – डॉ. विष्णू देवरे (स्त्रीरोगतज्ज्ञ), डॉ. अर्जुन शिंदे (बालरोगतज्ज्ञ), डॉ. राजेंद्र शिर्के, डॉ. नितीन करवंदे आणि डॉ. शंकर शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
माजी अध्यक्ष डॉ. करण घुले यांच्या हस्ते नव्या कार्यकारिणीने पदभार स्वीकारला. या प्रसंगी मान्यवरांनी डॉक्टरांमधील एकात्मता, सहकार्य आणि समाजसेवेचे महत्त्व सांगितले. समारंभ आनंदमय आणि मैत्रीपूर्ण वातावरणात पार पडला.
नवीन कार्यकारिणीकडून वैद्यकीय सेवेबरोबरच सामाजिक उपक्रमांना नवी दिशा देवू, असा विश्वास नवीन अध्यक्ष डॉक्टर गळनिंबकर यांनी व्यक्त केला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

