नेवासे : नगरपंचायतीच्या होवू घातलेल्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांनी नावनोंदणी करण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पटारे यांनी केले आहे.
गेल्या आठवड्यात नाशिक, संगमनेर व अहिल्यानगर येथे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कामाला लागण्याचे
आदेश देण्यात आले.

त्यानंतर येथेदेखील कार्यकर्त्यांच्या बैठका पार पडल्या. यावेळी अनेकांनी स्वबळावर पक्षाने निवडणूक लढवण्याचे मत व्यक्त केले. त्याअनुषंगाने नगराध्यक्षपद व सर्व १७जागांवर प्रबळ उमेदवार देण्याचे एकमताने ठरले.
लवकरच पक्षाच्यावतीने निरीक्षक सुरेश मारू शहरात येवून बैठक घेवून थोरातांसमवेत चर्चा करून निर्णय घेणार असल्याने पक्षाकडे जास्तीत जास्त इच्छुकांनी नावनोंदणी करावी, असे आवाहन पटारे यांनी केले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

