नेवासा – राज्यातील नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरू असतानाच संगणक प्रणालीतील बिघाडामुळे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना मोठा फटका बसला आहे.
जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरातील उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी त्रस्त झाले आहेत.
सध्या पालिका निवडणुकांची उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर असून केवळ सात दिवसांत ही प्रक्रीया पुर्ण करायची आहे. त्यात रविवारी सुट्टी असल्याने उमेदवारांची धावपळ वाढली आहे. या निवडणुकीत अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे असल्याने संगणक ज्ञान नसलेल्या अनेक उमेदवारांना सेतू केंद्र, सायबर कॅफे किंवा खाजगी कॉम्प्युटर सेंटरचा आधार घ्यावा लागत आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांनी केंद्रांच्या या चालकांना उमेदवारांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असले तरी नगराध्यक्ष पदासाठीची ऑनलाईन प्रणालीच वारंवार बंद पडत असल्याने उमेदवार आणि संगणक चालक दोघेही वैतागले आहेत.
यासंदर्भात काही उमेदवारांनी प्रशासनाकडे तक्रारी नोंदवून प्रणाली तत्काळ सुरळीत करण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाने या तांत्रिक बिघाडाकडे गांभीर्याने पाहून तातडीने तोडगा काढावा, अशी सर्वपक्षीय मागणी होत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

