दत्त जयंती

नेवासा : श्री. क्षेत्र देवगड संस्थानमध्ये दि. २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान भगवान श्री दत्तप्रभूचा जन्मोत्सव सोहळा साजरा होत आहे. सात दिवस ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा श्री दत्त यागाचे आयोजन करण्यात आले आहे नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन होणार आहे.

गुरुवारी (दि. ४) दत्तप्रभूचा जन्मोत्सव सोहळा होणार आहे. या दिवशी सायंकाळी सहा वाजता लाखो भक्तगणांच्या उपस्थितीत व मान्यवर संत- महंतांचे उपस्थितीत भगवान श्री दत्तप्रभूचा जन्मोत्सव सोहळा साजरा होईल. या सोहळ्यासाठी महंत भास्करगिरी महाराज तथा उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज हे कार्यक्रमाचे आयोजनाच्या दृष्टीने तयारी करीत आहेत. भाविकांसाठी अन्नदान. चहापाण, नित्य उपक्रम, अध्यात्मिक उपक्रमाच्या व्यवस्थेसाठी वेगवेगळ्या भक्तांचे समूह बनवत प्रत्येकाकडे विशिष्ट जबाबदारी सोपवत हा सप्ताह कसा चांगला व आनंददायी होईल यासाठी प्रयत्न केले जात आहे.

दत्त जयंती

नेवाशाचे पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी नुकतीच देवगड येथे भेट देऊन पाहणी केली. त्याचप्रमाणे राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस साठी गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, नेवासा, अहिल्यानगर या स्थानकांचे डेपो देखील निश्चित करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने देखील तयारी करण्यात आलेली आहे. महावितरणद्वारे अखंड वीजपुरवठा सुरू राहील, याची दक्षता घेण्यात येत आहे.

श्रीक्षेत्र देवगड संस्थान ते देवगड फाटा रस्ता, प्रवरासंगम माळेवाडी ते देवगड रस्ता, व नेवासा खडका फाटा रस्ता, मडकी. खलाल पिंप्री मार्गे देवगड रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम बांधकाम विभागामार्फत करण्यात येत आहे. देवगड रस्तााचे डांबरीकरण करणे.

दत्त जयंती

खडका फाटा नेवासा रस्त्यावर नव्याने झालेला पूल त्यावर काँक्रिटीकरण ही कामे जोरात सुरू आहेत. सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता युवराज कोकरे तसेच उप अभियंता विनायक पाटील, शाखा अभियंता सायाम, बी.टी. सोनवणे हे शासकीय अधिकारी बांधकाम ठेकेदार आर.व्ही. जाधव.बी.एस. सोनवणे यांच्याकडून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करून घेत आहेत.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

दत्त जयंती
दत्त जयंती

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

दत्त जयंती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *