नेवासा –बाजार समिती परिसरातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये साठवलेली तूर, मूग, उडीद, सोयाबीन, गहू आणि मका या धान्यपिकांचा शेकडो क्विंटल माल कीडग्रस्त झाल्याचे उघड झाले आहे. व्यापारी व शेतकऱ्यांचा लाखोंचा माल नाश पावल्याने संताप व्यक्त होत आहे.
शेतकरी मोसिन पठाण आणि नामदेव क्रूडे यांचा गहू पूर्णपणे न खाण्यायोग्य झाला आहे. विशेष म्हणजे त्यांनी गहू केवळ खाण्यासाठी विकत घेऊन गोदाममध्ये ठेवला होता. व्यापारी साळुंके यांचा मक्याचा साठा कीडग्रस्त झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणात नुकसानीबाबत विचारणा केली असता गोदामातील अधिकाऱ्यांकडून टाळाटळीची भाषा वापरल्याचा आरोप शेतकरी व व्यापाऱ्यांनी केला आहे.
व्यापारी आणि शेतकरी संघटनांनी तत्काळ पंचनामा करून नुकसानीचा आकडा जाहीर करावा आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, या आरोपांना साठा अधीक्षक प्रतीक दुसुंगे यांनी फेटाळले असून, गोदामातील धान्य कीडग्रस्त झालेले नाही. साठवणुकीचा आणि शेतकऱ्यांना दिलेला माल नियमांनुसार पूर्णपणे सुरक्षित आहे. काही व्यापारी व शेतकरी जाणीवपूर्वक आरोप करत असल्याचे त्यांनी सांगितले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

