नेवासा- तालुक्यात गेल्या दोन दिवसांत बिबट्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी दर्शन दिले तसेच प्राण्यांवर हल्ला केल्याने शहराजवळील ग्रामीणा भागात नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. नेवासा शहरापासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या गोधेगावातील जुन्या जामगाव रस्त्यावर काल रात्री ८.३० वाजेच्या सुमारास रामेश्वर गाडेकर (२३) हा आपल्या घराकडून वस्तीवरील घराकडे चालला असताना शेलार वस्तीजवळ बसलेला बिबट्या त्याला दिसला.

गाडेकर यांनी तत्काळ आपल्याजवळील टॉर्चचा प्रकाश बिबट्याच्या डोळ्यावर टाकत हळूहळू मागे सरकत सुरक्षितपणे घर गाठले. काही वेळानंतर परत पाहणी केली असता त्या ठिकाणी बिबट्याने एका डुकरावर हल्ला करून त्याला ठार केले. याच रात्री नेवासा-उस्थळ रस्त्यावर, मोहनराव कुटे यांच्या वस्तीवरही रात्री बाराच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. घरासमोर बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला केला. बिबट्या आल्याचे समजताच मोहन कुटे यांचे वडिल भास्करराव कुटे यांनी फटाके आणि तोफा वाजवल्यानंतर बिबट्या पळून गेला. गोधेगाव परिसरात सुमारे महिन्यापूर्वीही बिबट्याने हल्ला केला होता.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

