नेवासा (दि. 13 नोव्हेंबर 2025) — नेवासा नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होऊन आज चौथा दिवस उलटला असतानाही, अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. प्रशासनाच्या ढिसाळ आणि गलथान कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा उमेदवार व नागरिकांमध्ये सुरू आहे.
इच्छुक उमेदवारांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, नगरपंचायत प्रशासनाकडून आवश्यक थकबाकी नसल्याचे एनओसी प्रमाणपत्र वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे अर्ज दाखल करण्यास विलंब होत आहे. काही उमेदवारांनी असा आरोप केला आहे की, कधी अधिकारी उपस्थित नसतात, तर कधी कामकाजाच्या वेळेतही संबंधित विभाग बंद आढळतो, त्यामुळे प्रक्रियेत गोंधळ निर्माण झाला आहे.

नगरपंचायत निवडणुकीच्या उमेदवारी अर्जासोबत कर भरल्याच्या पावत्या आणि थकबाकी नसल्याचे निल सर्टिफिकेट जोडणे अनिवार्य आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आज चौथ्या दिवशीदेखील एकही अर्ज दाखल होऊ शकलेला नाही.
या अकार्यक्षमतेमुळे इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या सूचकांचे मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. नागरिक व उमेदवार प्रशासनाकडून तत्काळ कार्यवाही व सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

