शेतीमधील विविध तंत्रज्ञान प्रचार आणि प्रसार मध्ये कृषि विस्तार अधिकारी यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. त्यासाठी त्यांना शेतीमधील नव नवीन तंत्रज्ञान विषयी चे प्रशिक्षण देणे हा एक कृषि विज्ञान केंद्राचा उद्देश आहे. याचाच एक भाग म्हणून कृषि विस्तार अधिकारी यांच्यासाठी रब्बी हंगामातील महत्वाची पिके जसे गहू, हरभरा आणि ऊस पिक एकात्मिक उत्पादन तंत्रज्ञान या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
या प्रशिक्षात कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. श्यामसुंदर कौशिक यांनी गहू पिकातील आधुनिक तंत्रज्ञान जसे वेळेवर पेरणी, योग्य गहू वाणांचा वापर, अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि तण नियंत्रण या विषयी मार्गदर्शन केले. श्री माणिक विषय विशेषज्ञ (पिक संरक्षण) यांनी गहू, हरभरा आणि ऊस पिकातील किड व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले.

इंजि. राहुल पाटील, विषय विशेषज्ञ (कृषि अभियांत्रिकी) यांनी रब्बी हंगामातील पिकांमध्ये विविध औजारे जसे ऊस लागवड यंत्र, मका टोकन यंत्र, बिज प्रक्रिया यंत्र, रुंद सरी वरंबा पेरणी यंत्र इ. औजारांचा वापर या विषयी मार्गदर्शन केले. नारायण निबे, विषय विशेषज्ञ (कृषि विद्या) यांनी हरभरा आणि ऊस पिक एकात्मिक उत्पादन तंत्रज्ञान या विषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना सचिन बडधे तर आभार प्रकाश बहिरट यांनी मानले. कृषि विज्ञान केंद्राचे सर्व शास्त्रज्ञ व कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

