नेवासा- 14 नोव्हेंबर 1889 मध्ये पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू यांचा जन्म झाला.त्यांचा जन्मदिवस हा बाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. बालकांना त्यांचे अधिकार व भविष्यासाठी, कल्याणसाठी समाजात जागृत करावी. यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे मत कार्यक्रमाच्या पाहुण्या व त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष ॲड.स्नेहल चव्हाणपाटील यांनी व्यक्त करत विद्यार्थ्यांना बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष व श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगेपाटील विद्यालय चे प्राचार्य सोपान काळे यांनीही बालसैनिकांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक संजय चौहान,विभागप्रमुख संतोष निंबाळकर, बाळासाहेब साबळे, एकनाथ कापसे, दत्तू गर्जे,नामदेव ताके,अंजली होन, प्राथमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सूत्रसंचालन त्रिमूर्ती प्राथमिक विद्यालयाचे शिक्षक अर्जुन भांड यांनी केले तर विद्यालयाचे मुख्याध्यापक योगेश भवर यांनी आभार मानले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

