खरेदीखत

मृत व्यक्तीला साक्षीदार दाखवून मालमत्ता हडपली, चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

नेवासा- तालुक्यात एका अत्यंत धक्कादायक फसवणूक प्रकरणात थेट दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नोंदींचा गैरवापर झाल्याचे उघड झाले आहे. मौजे जेऊर हैबती (ता. नेवासा) येथील मंडप व्यावसायिकांनी तब्बल चार वर्षांपूर्वी एका मालमत्तेवर बनावट कागदपत्रे, खोट्या सह्या आणि विशेष म्हणजे मृत व्यक्तीला साक्षीदार दाखवून खरेदीखत नोंदवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

फिर्यादीला न्याय मिळत नसल्याने त्यांनी थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असता, न्यायालयाने आता या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे.

जेऊर हैबती येथील मिळकत क्र. ६४/४ (क्षेत्र ७६३ चौ. फुट) ही मालमत्ता फिर्यादी दत्तात्रय यादव शिंदे यांच्या मालकीची होती. ही मालमत्ता त्यांच्याच नावावर असताना आरोपी क्रमांक १) सुभाष मच्छिंद्र औटी, २) भागवत बबन गायके, ३) राम बंडू शिंदे, आणि ४) मंगेश उर्फ बंडू गोरख मुटकुळे यांनी संगनमत केले.

खरेदीखत

या आरोपींनी मिळून दस्त क्रमांक ४७६३/२०२० हे बनावट खरेदीखत २ डिसेंबर २०२० रोजी नोंदवले. आरोपींनी फिर्यादीचे बनावट आधारकार्ड तयार केले आणि त्यावर आरोपी क्रमांक ४ चा फोटो वापरला.
फिर्यादीच्या नावाने खोटी सही करून दस्त
नोंदवला गेला. या व्यवहारात साक्षिदार म्हणून दाखवलेला बंडू यादव शिंदे हा व्यक्ती ९ एप्रिल २०१८ रोजीच मयत झाला होता. मृत व्यक्तीला साक्षीदार दाखवणे, हे गंभीर संगनमताचे उदाहरण असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.

सरकारी नोंदींमध्येही फेरफार
या बनावट खरेदीखताच्या आधारे आरोपींनी थेट सिटी सव्र्व्हे ऑफिस आणि ग्रामपंचायत रेकॉर्डमध्येही बदल करून मालमत्ता आरोपी क्रमांक १ (सुभाष मच्छिंद्र औटी) च्या नावावर नोंदवून घेतली. फिर्यादी दत्तात्रय शिंदे यांनी नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास नकार दिला. तसेच, जिल्हा पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्याकडे लेखी तक्रार देऊनही कारवाई न झाल्याने अखेर फिर्यादींनी कायदेशीर लढाईसाठी न्यायालयाचा आश्रय घेतला.

खरेदीखत

चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
फिर्यादींनी अॅड. संजय बी. लवांडे पाटील व अॅड. सौ. स्मिता एस. लवांडे-पाटील यांच्यामार्फत नेवासा येथील मे. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास (वर्ग १) न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यावर सुनावणी करताना, फौजदारी न्यायालय क्रमांक ४, नेवासा यांनी पोलिसांना त्वरित आरोपी क्रमांक १ ते ४ यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता मधील फसवणूक, बनावटगिरी आणि संगनमत संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदवून सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

खरेदीखत
खरेदीखत

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

खरेदीखत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *