नेवासा- नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी परवानाधारकांनी आपल्या ताब्यातील बंदुका, पिस्तुल यासारखी शस्त्रे संबंधित पोलीस ठाण्यात जमा करावीत, अशा सूचना नेवासे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिल्या.
या निर्देशानुसार नेवासे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शस्त्रे जमा करण्याची मोहीम सुरू झालेली आहे. नेवासे शहरातील हद्दीत एकूण १० परवानाधारक नागरिकांकडे शस्त्रे असून त्यांना ही शस्त्रे जमा करण्यासाठी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी नोटिसा पाठविण्यात आलेल्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिली.

कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून नेवासे पोलिसांनी खबरदारी म्हणून निवडणुकीच्या काळात शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शस्त्रविरहित वातावरण आवश्यक असल्याचे पोलीस प्रशासनाचे मत असून याकामी पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे. या निवडणुकी दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून ही खबरदारी घेतली जात आहे.
सर्व परवानाधारकांनी स्वखुशीने शस्त्रे संबंधित पोलीस ठाण्यात जमा करावीत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

