नेवासा – महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना व हिंगोली जिल्हा धनुर्विद्या संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली येथे दि.8 ते 10 नोव्हेंबर 2025 दरम्यान संपन्न झालेल्या 24 व्या सब ज्युनिअर राज्यस्तरीय धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धेत इंडियन राउंड प्रकारामध्ये प्रथमेश पार्टे इ. 10 वी त्रिमूर्ती पब्लिक स्कूल याने एक सिल्वर व एक ब्रांझ मेडल मिळवून राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात स्थान पटकावले.
राष्ट्रीय सब ज्युनिअर धनुर्विद्या स्पर्धा इटानगर (अरुणाचल प्रदेश) या ठिकाणी दि.22 ते 30 नोव्हेंबर 2025 दरम्यान होणार आहेत.

वरील खेळाडूचे त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान च्या अध्यक्षा ॲड . सुमतीताई घाडगे पाटील,उपाध्यक्षा ॲड.स्नेहल दीदी चव्हाण पाटील ,सचिव मनिष घाडगे पाटील,सह सचिव डॉ.श्रुतिदिदी आम्ले पाटील,प्राचार्य सोपान काळे,ज्येष्ठ क्रीडा शिक्षक संजयसिंह चौहान ,सैनिकी अधिकारी धवन सर,अरविंद देशमुख ,डॉ.अनुराधा गोरे , होन मॅडम ,आरसुले सर यांनी वरील सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेकरिता हार्दिक शुभेच्छा दिल्या
वरील सर्व खेळाडूंना विद्यालयाचे प्रशिक्षक अभिजीत दळवी,संभाजी निकाळजे,महादेव काकडे,छबुराव काळे, अशोक पानकडे, साहेबराव दाणे ,गौरव दाणे,शैलेश दाणे समीर शेख , सर्व सैनिकी प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

