शुक्रवार दि. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी बाल दिनानिमित्त सीबीएसई पॅटर्नचे रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूलमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन. बालदिनाचे औचित्य साधत या दिवशी सुबक व संस्कार-प्रधान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जाणारा बालदिन हा मुलांचा आनंद, हक्क, शिक्षण आणि सर्वांगीण विकासाचा संदेश देणारा दिवस मानला जातो. याच भावनेतून रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूलने विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि मूल्यआधारित कार्यक्रमाची रूपरेषा आखली होती.
सुरुवातीला कार्यक्रमाची सरुवात शिक्षकांनी सादर केलेल्या परिपाठाने झाली.

कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती शाळेचे चेअरमन श्री. भाऊसाहेब अंबाडे साहेब, प्रिन्सिपल श्री. पिटर बारगळ सर व मुलांचे प्रतिनिधी असलेले इयत्ता पहिली तील विद्यार्थिनी कु. वेदीका काळे व इयत्ता नववी तील विदयार्थी आयुष मचे यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दिपप्रज्वलन व प्रतिमापूजन झाले. शाळेतील शिक्षिका संगीता पारखे व विदया करांडे यांनी भाषणे सादर करून विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार, आत्मविश्वास व बालदिनाच्या इतिहासाचे महत्व सांगितले. शिक्षकांनी मुलांसाठी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम तसेच विविध प्रकारच्या खेळांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला मानाची उपस्थिती लाभली ते शाळेचे चेअरमन श्री. अंबाडे साहेब व प्रिन्सिपल पिटर बारगळ सर यांनी आपल्या भाषणात बालदिनाचे महत्व समजावून सांगताना विदयार्थ्यांना शिस्त, संस्कार आणि मानवतेच्या मूल्यांचा वारसा जोपासण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका मुक्ता जपे व अतुल पटारे यांनी आपल्या प्रभावी शब्दरचनेने सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी इयत्ता नववी तील विदद्यार्थिनी किर्ती जाधव हिने शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व उपस्थितांचे आभार मानले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

