नगरपंचायत

नेवासा –नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शनिवारी सहाव्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी दोन व्यक्तींकडून एकूण ३ तर नगरसेवकपदासाठी ६. व्यक्तींचे ६ अर्ज दाखल झाले. शुक्रवारी नगरसेवक पदासाठी एक अर्ज दाखल झाल्याने आतापर्यंत नगरसेवक पदासाठी ७ व्यक्तींचे ७ अर्ज तर नगराध्यक्ष पदासाठी दोन व्यक्तींचे तीन अर्ज असे एकूण नगरपंचायत निवडणुकीसाठी ९ व्यक्तींचे १० अर्ज दाखल झाले आहेत.

शनिवारी नगराध्यक्ष पदासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकुमार लक्ष्मणराव पाटील यांनी नगराध्यक्षपदासाठी क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून अर्ज सादर केला. संजय लक्ष्मण सुखदान यांनी आम आदमी पार्टीकडून एक तसेच अपक्ष म्हणून एक असे दोन अर्ज दाखल केले.

नगरपंचायत

नगरसेवक पदासाठी प्रभाग क्र. ३ मधून सुभाष टेमक यांनी काँग्रेस पक्षाकडून अर्ज सादर केला. जितेंद्र

भाऊसाहेब कुर्हे यांनी प्रभाग ४ मधून क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून अर्ज भरला. प्रभाग ७ मधून क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून सुषमा गणेश कोरेकर यांनी अर्ज भरला. प्रभाग क्र. ९ मधून क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून चंद्रकला अण्णासाहेब बेळे यांनी अर्ज भरला.

प्रभाग १६ मधून प्रवीण शामराव सरोदे यांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून अर्ज दाखल केला. प्रभाग क्र. १७ मधून भाजपच्यावतीने रोहिदास अंबादास पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

शेवटच्या दोन दिवसांत अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच पक्षांतर्गत अनेकांची उमेदवारी दडपली जाण्याची शक्यता असल्याची चर्चा रंगल्याने अर्ज भरू की नको अशी अनेकांची स्थिती आहे. १७ नोव्हेंबरला शेवटच्या दिवशी आणि शेवटच्या क्षणी ताण वाढण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली.

newasa news online
नगरपंचायत

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

नगरपंचायत
नगरपंचायत

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

नगरपंचायत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *