वाळू

नेवासा-आज दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी माननीय उपविभागीय अधिकारी अहिल्यानगर श्री सुधीर पाटील सर यांनी भल्या पहाटे घोगरगाव येथील गोदावरी नदी पात्राला भेट दिली तेव्हा त्यांना महादेव मंदिराच्या शेजारी अवैध अवैध उपसा करणारी बोट आढळून आली व वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले त्यांनी तात्काळ तहसीलदार नेवासा यांना संबंधित बोट वर कारवाई करण्याची सूचना केली उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार आदेशानुसार तहसीलदार नेवासा यांनी पोलीस उपनिरीक्षक व महसूल यंत्रणेला पत्रव्यवहार करून व अवैध उपसा करणाऱ्या बोटेला यंत्रसामुग्रीला नष्ट करण्यासाठी जिलेटिन देऊन पथक पाठवले व जिलेटिन च्या साह्याने आज दुपारी चार वाजता संबंधित बोट फोडण्यात आली

वाळू

कारवाई मध्ये ही बोट पूर्णता पाण्यामध्ये बुडून गेली यावेळी पथकामध्ये नायब तहसीलदार श्री बोरुडे साहेब मंडळ अधिकारी श्री माने तलाठी श्री लोंढे पोलीस उपनिरीक्षक श्री पवार उपस्थित होते अवैध वाळू उपशावर केलेल्या कार्यवाहीमुळे पंचक्रोशीतील घोगरगाव गावासह इतर गावातील नागरिक सुखावले आहेत कारण यामध्ये नागरिकांना परेशान करणारी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोके सामील होते

newasa news online
वाळू

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वाळू
वाळू

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वाळू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *