नेवासा नगरपंचायत निवडणुकांसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची आज अंतिम मुदत होती. शेवटच्या दिवशी दिवसभर उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. दुपारी तीन वाजता नियमानुसार उमेदवारांना तहसील कार्यालयामध्ये प्रवेश देण्यात आला, तर त्यानंतरही उशिरापर्यंत दाखल झालेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरूच होती.
१७ प्रभागांसाठी एकूण १७१ अर्ज दाखल
नगरपंचायत निवडणुकीसाठी आज अखेर विविध राजकीय पक्षांकडून आणि अपक्षांकडून मिळून एकूण १७१ नामांकन अर्ज दाखल झाले.
तर नगराध्यक्ष पदासाठी २७ अर्ज दाखल झाले असून चुरशीची लढत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे अधिकृत एबी फॉर्मनुसार उमेदवारांची यादी,

प्रभाग क्रमांक १
- आहेर राजश्री प्रभाकर – शिवसेना
- शिंदे जयश्री चंद्रकांत – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
- गव्हाणे उज्वला शेखर – राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग क्रमांक २
- सुखदान शालिनी संजय – आम आदमी पार्टी
- धायजे छाया दिगंबर – शिवसेना
प्रभाग क्रमांक ३
- टेमक सुभाष बाबुराव – राष्ट्रवादी काँग्रेस
- म्हस्के अंकुश कचरू – शिवसेना
- सोनवणे रंजीत दत्तात्रय – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
प्रभाग क्रमांक ४
- कुऱ्हे जितेंद्र भाऊसाहेब – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
- दहिवळकर विजय पोपट – शिवसेना
प्रभाग क्रमांक ५
- बर्वे श्रीकांत दादासाहेब – राष्ट्रवादी काँग्रेस
- लोखंडे महेश शंकर – भाजपा
- फटांगरे दिलीप लक्ष्मण – क्रांतिकारी शेतकरी पक्ष

प्रभाग क्रमांक ६
- धोत्रे संभाजी शिवाजी – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
- डोकडे भारत मोहन – राष्ट्रवादी काँग्रेस
- बोरुडे विलास सखाराम – भाजपा
प्रभाग क्रमांक ७
- कोरेकर सुभाष गणेश – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
- बोरकर रोहिणी अल्पेश – राष्ट्रवादी काँग्रेस
- नळकांडे अमृता श्रीकांत – भाजपा
- परदेशी भारती कृष्णा – शिवसेना
प्रभाग क्रमांक ८
- मोरे रोहिणी बाबासाहेब – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
- लगे कल्याणी सतीश – राष्ट्रवादी काँग्रेस
- सरकळे मेघा संदीप – शिवसेना
प्रभाग क्रमांक ९
- चंद्रकला अण्णासाहेब बेहेळे – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
- अलवणे अनिता संदीप – आम आदमी पार्टी
- शितल निरंजन डहाळे – भाजपा
प्रभाग क्रमांक १०
- शेजुळ प्रतीक जितेंद्र – राष्ट्रवादी काँग्रेस
- मापारी सागर राजेंद्र – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
- नरुला अजितसिंग हरभजनसिंग – भाजपा
प्रभाग क्रमांक ११
- पठाण शायदाबी इलायतखान – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
- मापारी अमित रमेश – भाजपा
- अत्तार करजाना रईस – आम आदमी पार्टी
प्रभाग क्रमांक १२
- सोनल राहुल चव्हाण – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
- वाघ नीता सुनील – भाजपा

प्रभाग क्रमांक १३
- शेख नसरीन मुक्तार – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
- फर्जना रईज – आम आदमी पार्टी
- शेख अंजुम इम्रान – राष्ट्रवादी काँग्रेस
- डहाळे मोहिनी कृष्णा – भाजपा
प्रभाग क्रमांक १४
- काळे मिरा राजेंद्र – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
- दारुंटे गंगुबाई – शिवसेना
प्रभाग क्रमांक १५
- गवळी प्रतिभा जालिंदर – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
- कदम छाया पोपटराव – राष्ट्रवादी काँग्रेस
- पारखे गीता मनोज – भाजपा
प्रभाग क्रमांक १६
- बनसोडे सचिन दिलीप – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
- पिंपळे रवींद्र फुलचंद – राष्ट्रवादी काँग्रेस
- वडागळे सचिन फिलीप – भाजपा
प्रभाग क्रमांक १७
- बोर्डे अंकुश लक्ष्मण – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
- मोरे अजय सुभाष – राष्ट्रवादी काँग्रेस
- पवार अनिल भाऊसाहेब – भाजपा
नगराध्यक्ष पदासाठी पक्षांचे अधिकृत उमेदवार
- पाटील नंदकुमार लक्ष्मणराव – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
- सुखदान संजय लक्ष्मण – आम आदमी पार्टी
- सचिन विलासराव कडू – राष्ट्रवादी काँग्रेस
- घुले करणसिंह भाऊसाहेब – शिवसेना
भाजपा–शिवसेना महायुतीचे काही प्रभाग अद्याप गुलदस्त्यात
काही प्रभागांमध्ये महायुतीकडून एबी फॉर्म जाहीर न झाल्याने उमेदवारीबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. संबंधित प्रभागांत अंतिम क्षणी उलथापालथ होण्याची शक्यता असल्याचे पक्ष सूत्रांचे म्हणणे आहे.
ह्या नावांची अधिकृत छाननी, अर्ज मागे घेण्याची तारीख आणि अंतिम अधिकृत यादी जाहीर झाल्यानंतर नेवासा नगरपंचायतची निवडणूक रंगतदार होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

