अहिल्यानगर : घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा (DV Act) अंतर्गत केलेल्या तक्रारीतील आरोप ठोस पुराव्याअभावी सिद्ध न झाल्याने आणि कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर झाल्याचे स्पष्ट होत असल्याने, उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादने पती वगळता इतर सर्व नातेवाइकांवरील प्रकरण रद्दबातल केले आहे.
अहिल्यानगरातील देवीचे धामनगाव येथील युवकासोबत विवाह झाल्यानंतर पती-पत्नीमध्ये मतभेद निर्माण झाले होते. नंतर अंर्तविरोध वाढत गेल्याने दोघेही वेगळे राहत होते. यानंतर पत्नीने पती व त्याच्या कुटुंबातील सात जणांविरुद्ध DV Act कलम १२ इत्यादी अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीविरुद्ध पती व इतर नातेवाइकांनी अॅड. गणेश प्रभाकर दरंदले यांच्या माध्यमातून उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे फौजदारी अर्ज दाखल करून तक्रार रद्द करण्याची मागणी केली. न्यायमूर्ती सचिन देशमुख यांच्या खंडपीठासमोर सुनावणीदरम्यान अॅड. दरंदले यांनी पत्नीने केलेले आरोप पतीच्या कुटुंबियांचा छळ करण्याच्या हेतूने केल्याचे, तसेच पती-पत्नी वेगळे राहत असल्याने इतर नातेवाइकांचा या वादाशी संबंध नसल्याचे निदर्शनास आणून दिले.
सुनावणीनंतर न्यायालयाने तक्रार ही कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर असल्याचे स्पष्ट करत, पती वगळता उर्वरित सर्व नातेवाइकांवरील प्रकरण रद्द करण्याचा निर्णय दिला.
या फौजदारी अर्जाच्या प्रक्रियेमध्ये अॅड. गणेश प्रभाकर दरंदले यांना अॅड. राहुल किशोर गारूळे यांनी सहकार्य केले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

