खेडले परमानंद व शिरेगाव ग्रामस्थांच्या वतीने विद्यार्थी व शेतकऱ्यांची वाहतुकीची नियमित होत असलेली गैरसोय लक्षात घेता नेवासा पानेगाव शिरेगाव-खेडले परमानंद- मार्गे सोनई बस सेवा सुरू करण्यासंबंधीचे निवेदन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे नेवासा आगार व्यवस्थापक प्रशांत होले यांना देण्यात आले .
गेल्या अनेक वर्षांपासून वाहतुकीच्या गैरसूवीमुळे अनेक विद्यार्थिनींचे शिक्षण अधुरे राहिले आहे .बिबट्याचा मुक्त संचार वाढल्यामुळे सायकलवर विद्यार्थ्यांना जाणं आता जीवावर खेळण्या गत झालेला आहे .हा मोठा जिकरीचा प्रश्न आहे.
जवळच असलेल्या सोनई या ठिकाणी जाण्यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी, महिला,वृद्ध आजारी व्यक्ती यांची मोठी गैरसोय होते.

ही बाब लक्षात घेऊन तातडीने बस सेवा सुरू करावी अशी मागणी शिरेगाव व खेडले परमानंद ग्रामस्थांच्या वतीने शिरेगावचे माजी सरपंच किरण जाधव व खेडले परमानंद येथील समाजसेवक संभाजी शिंदे यांच्या वतीने निवेदन आज देण्यात आले .प्रसंगी दोन्ही गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.
यावेळी आगार व्यवस्थापक प्रशांत होले यांनी सांगितले की लवकरच संबंधित बाबीचा विचार करून तातडीने बस सेवा सुरू करण्यात येईल.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

