शुगर

नेवासा – पंचगंगा शुगर अँड पॉवर प्रा. लि., महालगाव येथील ऊस बागायतदारांना दिलेला आश्वासक शब्द पाळत कारखान्याकडून पहिल्या पंधरवड्याचे ऊस पेमेंट वेळेवर करण्यात आले आहे. १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत गळीतास आलेल्या सर्व ऊसाचा मोबदला आज, १ डिसेंबर २०२५ रोजी थेट बागायतदारांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला.

या कालावधीत २६५ ऊस जातीस प्रति मे.टन ३,०५० रुपये तर इतर जातींसाठी ३,१५० रुपये इतका दर निश्चित करण्यात आला होता. ठरलेल्या दरानुसार कोणतीही कपात न करता संपूर्ण रक्कम बिनचूक खात्यात जमा झाल्याने बागायतदारांनी समाधान व्यक्त केले आहे.

शुगर

यंदाच्या हंगामात कारखान्याने ‘पारदर्शक वजन काटा व पंधरा दिवसांत पेमेंट’ ही प्रमुख तत्वे केंद्रस्थानी ठेवून कारभार सुरु केल्याने बागायतदारांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. वास्तविक वजन प्रमाणे ऊसाचा हिशेब होत असल्याने कोणत्याही शंका-कुशंका राहिलेल्या नाहीत.

चेअरमन यांनी हंगामाच्या सुरुवातीपासूनच वेळेवर पेमेंट देण्याची हमी दिली होती. ती आज प्रत्यक्षात पूर्ण करत बागायतदारहिताचे धोरण कारखान्याने जपल्याचे मानले जात आहे. वेळीच मिळालेल्या पेमेंटमुळे बागायतदारांना हंगामातील पुढील खर्चाची तरतूद सुलभ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.


“खाजगी वजन करण्याची परवानगी असल्याचा राज्यात पहिला मान: पंचगंगाकडे उसाचा वाढता ओढा”
पंचगंगा हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खाजगी वजनकाट्यावर ऊस वजन तोलण्याची प्रथमच मुभा देणारा कारखाना ठरला असून त्यामुळे बागायतदारांचा ओढा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इतर कारखान्यांनीही अशीच मुभा द्यावी, अशी मागणी शेतकरी करत असून अन्यथा वजनकाट्यांमध्ये फेरफार होत असल्याचा संशय अधिक बळकट होतो

शुगर
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शुगर
शुगर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शुगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!