नेवासा येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित ज्ञानोदय इंग्लिश स्कूल मध्ये शनिवार दि. १२डिसेंबर २०२५ रोजी शाळा स्तरावरील विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीराम विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जनार्दन शेंडे व अहिल्यानगर माध्यमिक शिक्षक सोसायटीचे माजी व्हा. चेअरमन श्री. ज्ञानेश्वर काळे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी नेवासा येथील श्री. विश्वेश्वर नाथबाबा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विजय नरोटे , ज्ञानोदयचे प्राचार्य श्री रावसाहेब चौधरी, कै.सुंदरबाई हिरालाल गांधी कन्या विद्यालयाच्या प्राचार्या सुरेखा पारखे, ज्ञानोदय इंग्लिश स्कूलच्या पर्यवेक्षिका सुनिता दिघे, ज्ञानोदय इंग्लिश मीडियम च्या समन्वयक अर्चना कोरडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

विज्ञान, गणित व पर्यावरण विषयातील विविध नवनिर्मित उपकरणांची माहिती सांगताना विद्यार्थी अतिशय आनंदी दिसत होते. शैक्षणिक वर्ष २०२५ हे विद्यालयाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे, त्यामुळे प्रदर्शनात एकूण ७५ उपकरणे मांडण्यात आली होती. ज्ञानोदय इंग्लिश मीडियमच्या लहान गटात विज्ञान विभागात ओम स्वप्नील मगर याने प्रथम क्रमांक तर ध्रुव मिनिनाथ जाधव याने द्वितीय क्रमांक पटकावला. गणित विभागात तनिष्का संकेत जामदार व अनुश्री सोमनाथ यादव यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला.

विद्यालयाच्या पाचवी ते आठवीच्या गटात सौरव विवेकानंद नन्नवरे याने प्रथम क्रमांक तर कार्तिक सुरेश खामकर व श्रावण नितीन शिंदे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. आयुष सूर्यभान उघडे याला उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.
नववी ते बारावीच्या गटात गौरव विवेकानंद नन्नवरे याने प्रथम क्रमांक पटकावला तर अर्णव अशोक डौले व प्रथमेश नानासाहेब गाढवे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. सोहम नारायण चापे या विद्यार्थ्याला उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय नरोटे व अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे माजी व्हा. चेअरमन ज्ञानेश्वर काळे यांनी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देऊन कौतुक केले. यापैकी श्री हनुमान विद्यालय गोंडेगाव येथे झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान-गणित प्रदर्शनात ज्ञानोदय इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी ओम स्वप्निल मगर यांने द्वितीय क्रमांक मिळवून त्याची जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. शालेय प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी सर्व अध्यापक बंधू-भगिनींनी परिश्रम घेतले. संजय आखाडे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रदर्शन प्रमुख जनार्दन बनकर यांनी आभार व्यक्त केले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

