नेवासा (प्रतिनिधी) – या शैक्षणिक वर्षातील नेवासा खुर्द विभागीय तालुकास्तर विविध गुणदर्शन स्पर्धा जि. प. शाळा, नेवासा बुद्रुक येथे उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कडा कॉलनी येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत १०० टक्के यश संपादन केले.
या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या चारही गटांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवत थेट तालुकास्तर स्पर्धेसाठी आपला प्रवेश निश्चित केला.
हस्ताक्षर – कुमार गटात ओम दत्तात्रय दिघे,
कथा सादरीकरण – बालगटात हर्षदा सागर गायकवाड,
वैयक्तिक गीत गायन – कुमार गटात अदिती दिगंबर लष्करे,
तर प्रतिष्ठेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात लहान गटाने प्रथम क्रमांक पटकावला.

या घवघवीत यशासाठी शाळेचे मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली सीमा कोल्हे मॅडम, प्रदीप कवडे सर, मीनाक्षी अवचरे मॅडम, संगीता पवार मॅडम आणि सचिन शिंदे सर यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच सहभागी विद्यार्थ्यांच्या पालकांनीही मोलाचे सहकार्य केले.
या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. जालिंदर वडघने सर, केंद्रप्रमुख श्री. संजय शेळके सर, विस्तार अधिकारी रुकसाना शेख मॅडम, गटशिक्षणाधिकारी साईलता सामालेटी मॅडम, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन करून कौतुक केले.
पुढील तालुकास्तर व जिल्हास्तर स्पर्धेसाठी सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

