नेवासा : शहरातील श्रीरामपूर-शेवगाव मार्गावर गतिरोधक बसवा, अन्यथा १ जानेवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नेवासा व्यापारी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. नेवासा शहरातील पोलिस ठाण्यासमोर भगतसिंग चौक, जैन मंदिरासमोर, प्राथमिक आरोग्य केंद्र, नाथबाबा चौक, गणपती चौक, तसेच जिल्हा परिषद मुलांची शाळा, बसस्थानक परिसरात अनेकदा अपघात झाले आहेत. नागरिकांनी अनेकदा तोंडी, लेखी पत्राद्वारे अनेक वेळा बांधकाम विभागाला निवेदन देत गतिरोधक बसविण्याची मागणी केली होती.

मात्र, अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नसल्याने व्यापारी संघटनेने सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांना आपल्या मागण्यांचे निवेदन पाठवून तत्काळ गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे. व्यापारी योगेश आलवणे, कमलेश छाजेड, सतीश पिंपळे, निखिल सावंत, कुर्बान शेख, आकाश जायगुडे, वसंत शिंगी, विजय कडू, आकाश लोखंडे, नामदेव पिंपळे, विजय चोरडिया, आसाराम वाखुरे आदी उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

