श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या ११ वी शास्त्रीय सल्लागार समितीची बैठक दहिगाव-ने येथे दिनांक २४ डिसेंबर रोजी संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त मा.श्री. काकासाहेब शिंदे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे आयसीएआर ‘अटारी’ पुणे चे प्रधान शास्त्रज्ञ डॉ. सय्यद शाकिर अली यांची उपस्थिती लाभली.
यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.श्याम सुंदर कौशिक यांनी केव्हीके दहिगाव-ने चा प्रगती अहवालाचे सादरीकरण केले. तर श्री. माणिक लाखे, श्री. नारायण निबे, श्री. सचिन बडधे, श्री. नंदकिशोर दहातोंडे, इंजि. राहुल पाटील व डॉ. चंद्रशेखर गवळी यांनी आपआपले विभागाच्या प्रगती अहवालाचे सादरीकरण केले. या सल्लागार समितीच्या बैठकीस समितीचे सदस्य व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथील कृषि तंत्रज्ञान प्रसारक केंद्राचे व्यवस्थापक डॉ. आनंद चवई, कृषिविद्या विभागाचे डॉ. उल्हास सुर्वे, डॉ. दत्तात्रय पाचारणे, उद्यानविद्या विभागाचे डॉ. अन्सार खान अत्तार, ‘आत्मा’ अहिल्यानगर चे प्रकल्प संचालक श्री.पी.एस.लाटे, राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन संचालनालयाचे डॉ. करू अप्पा, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड राहुरी चे व्यवस्थापक डॉ.सरोज वहाने, ऑल इंडिया रेडिओ अहिल्यानगरचे कार्यक्रम अधिकारी श्री. सुदाम बटुळे, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. दशरथ दिघे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. पी. शिंदे, महाबीज चे जिल्हा व्यवस्थापक श्री. सुनिल दौंड, बँक ऑफ बडोदा चे व्यवस्थापक श्री. दिपक कुमार सिंह, जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी श्री. विक्रम अर्णव हे हजर होते.

यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे डॉ. सय्यद शाकिर अली यांनी शेतीमध्ये मूल्यवर्धन, यांत्रिकीकरण, हवामान आधारित शेती, आपत्कालीन पीक व्यवस्थापन, चा-यासाठी मुरघास व नैसर्गिक शेती चा प्रसार कृषि विज्ञान केंद्राकडून व्हावा असे नमूद केले. डॉ. आनंद चवई यांनी जमिनीचे व मानवाचे आरोग्य या दोन्ही गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे नमूद करताना नाचणी पिकाचे क्षेत्र वाढवण्यास संधी असल्याचे सांगितले. श्री. पी.एस.लाटे यांनी निर्यातक्षम फळपिके बाबत संधी असल्याचे सांगितले तर श्री. सुदाम बटुळे यांनी आकाशवाणी अहिल्यानगर शेती तंत्रज्ञान प्रसार व शेतक-यांच्या हिताकरिता सदैव तत्पर असल्याचे सांगितले. डॉ. वहाने व डॉ. दिघे यांनी जिल्ह्यामध्ये दूध उत्पादन वाढीसाठी कशाप्रकारे संधी उपलब्ध आहेत याबद्दल आपले विचार प्रकट केले. यावेळी शेतकरी प्रतिनिधी सौ. कल्याणी मुरदारे, हुकूम बाबा नवले, शंकर जाधव, भगवान धूत, मुकुंद टाक, संजय तनपुरे, डॉ. शशिकांत शिंदे, दत्तात्रय शेरकर उपस्थित होते. बैठीकीनंतर शास्त्रीय सल्लागार समितीच्या सदस्यांना प्रकाश हिंगे यांनी केव्हीके प्रक्षेत्रावरील चालू असलेल्या उपक्रमांना तसेच विविध प्रकल्पांना भेटी देऊन माहिती दिली.

सदर कार्यक्रमासाठी कृषि विज्ञान केंद्राचे प्रकाश बहिरट, वैभव नगरकर, अनिल देशमुख, प्रविण देशमुख, दत्तात्रय वंजारी, गणेश घुले, संजय थोटे व अनिल धनवटे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राहुल पाटील तर सचिन बडधे यांनी आभार मानले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

