नेवासा : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेवासा मुली शाळेची विद्यार्थिनी सान्वी प्रशांत शिर्के हिने तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेत बालगटात प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी प्रवेश मिळवला.
कुमारी सान्वी हिने प्रथम केंद्रस्तरावर पुढे बीटस्तरीय स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक मिळवत शुक्रवारी तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवत शाळेचे नाव तालुक्यात उंचावले आहे. जिल्हा स्तरावर सुद्धा शाळेचे नाव उंचावण्यासाठी तयारी करणार असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक अरविंद घोडके यांनी सांगितले.

सान्वीच्या यशासाठी तिला केंद्रप्रमुख संजय शेळके यांनी मार्गदर्शन केले तर मुख्याध्यापक अरविंद घोडके,वर्गशिक्षिका वर्षा जगताप यांनी तिच्या यशासाठी मेहनत घेतली. सर्व शिक्षकांनी यासाठी सहकार्य केले.सान्वीच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वर्षा पठाडे व सर्व व्यवस्थापन समिती सदस्यांनी तिचे व मार्गदर्शक शिक्षक व तिच्या पालकांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

