नेवासा –तालुक्यात नागापूर फाटा परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत वाळू वाहतुकीकडे पोलीस प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असताना, महसूल विभागाने स्वबळावर धाडसी कारवाई करत दोन वाळू वाहतूक करणारे डंपर जप्त केले आहेत.
अनधिकृत वाळू वाहतुकीची माहिती मिळताच मा. तहसीलदार डॉ. संजय बिरादार साहेब यांनी तत्काळ कारवाईचे आदेश देत स्वतः पाठलाग करून डंपर पकडले. ही कारवाई मा. तहसीलदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या पथकाने केली.

जप्त करण्यात आलेले वाळू वाहतूक करणारे डंपर कोकणे बाळू मोहन व सागर खंडागळे यांच्या मालकीचे असून, सदर वाहने तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनसमोरील आवारात जमा करण्यात आली आहेत. संबंधित वाहन मालकांवर नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे.
या कारवाईसाठी महसूल विभागाच्या पथकात कांबळे मंडळ अधिकारी, कुलकर्णी साहेब तसेच तलाठी दराडे, परदेशी, रिंढे व जोशी यांनी सहभाग घेतला.
पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अवैध वाळू वाहतूक वाढत असतानाच महसूल विभागाने केलेली ही ठोस व धाडसी कारवाई तालुक्यात चर्चेचा विषय ठरली असून नागरिकांकडून या कार्यवाहीचे स्वागत करण्यात येत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

