श्रीरामपूर- येथील राजकीय तसेच गुन्हेगारी क्षेत्रातील असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागिरदार याच्यावर बुधवारी दुपारी श्रीरामपूर शहरात गोळीबार झाला. यामध्ये जखमी झाल्याने कामगार रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. तेथून त्याला अहिल्यानगर येथे हलविण्यात येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
दुपारी कब्रस्तानातून परत येत असताना जर्मन हॉस्पिटलसमोरील मुख्य गेटजवळ अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हल्लेखोर पसार झाले. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ऑगस्ट २०१२ मध्ये पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या स्फोटाच्या गुन्ह्यात बंटी जहागिरदार याला अटक करण्यात आली होती. याशिवाय श्रीरामपूरमध्ये इतरही गुन्हे दाखल असल्याने त्याला अनेकदा तडीपार करण्यात आले होते. पूर्वी राजकारणातही सक्रीय असल्याने आजचा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

