नेवासा – नेवासा-खडका रस्त्यावरील इंजिनिअर बाळासाहेब वाघ पाटील यांच्या जानकी पेट्रोलियम उद्योग समूहाचे उदघाटन श्री क्षेत्र देवगड संस्थानचे महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते व संत महंतांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.उद्योग निर्मितीमुळे समाज स्थिर होत असल्याने राष्ट्राला हातभार लागेल असा उद्योग उभा करा असे आवाहन देवगड गुरूदेव दत्त पिठाचे महंत गुरुवर्य राष्ट्र संत श्री भास्करगिरीजी महाराज यांनी केले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी मंत्री शंकरराव गडाख,आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी भेटी देऊन पेट्रोलियम उद्योग समूहाला शुभेच्छा दिल्या तर यावेळी झालेल्या उदघाटन कार्यक्रम प्रसंगी गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराजांच्या समवेत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त वेदांताचार्य हभप देविदासजी महाराज म्हस्के,त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत श्री रमेशानंदगिरीजी महाराज, खडेश्वरी देवस्थानचे महंत गणेशानंदजी महाराज,मंगेश महाराज वाघ,भाकचंद महाराज पाठक,मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर,उपाध्यक्ष कडूबाळ कर्डीले,नेवासा मार्केट कमिटीचे माजी सभापती शंकरराव लोखंडे,नेवासा बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील,नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले, नगरसेवक अँड.संजय सुखदान, मुळा कारखान्याचे संचालक रंगाभाऊ जंगले पाटील, नारायण लोखंडे, निलेश पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी आलेल्या मान्यवरांचे जानकी उद्योग समूहाचे प्रमुख मार्गदर्शक इंजिनिअर बाळासाहेब वाघ यांनी स्वागत केले.युवा उद्योजक मनीष वाघ यांनी प्रास्ताविक केले.यावेळी वाघ परिवाराच्या वतीने इंजिनियर बाळासाहेब वाघ,सुभाष वाघ,सुनील वाघ,पोपट वाघ,मनीष वाघ,धनंजय वाघ,शंतनू वाघ,प्रथमेश वाघ,विजय रसाळ यांनी आलेल्या मान्यवरांचा सत्कार व संत महंतांचे पूजन करण्यात आले.
यावेळी बोलतांना गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज म्हणाले की उद्योगातून राष्ट्राला हातभार लागेलं असा उद्योग उभा करावा,इतरांचे अश्रू पुसल्यास आपल्या उद्योगातील संपत्तीला ही सुगंध येईल,उद्योग हा श्रद्धेने व लक्षपूर्वक सचोटीने केला पाहिजे,समाज स्थिर रहाण्यासाठी आज उद्योग क्षेत्र वाढविण्याची गरज आहे म्हणून समाज हिताचे उद्योग उभे करा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले.

यावेळी इंजिनियर सुनीलराव वाघ,माजी नगराध्यक्ष सतीश पिंपळे, बन्सीभाऊ आगळे, माजी सरपंच सतीश गायके, अशोकराव मंडलिक, दिलीप सरोदे-सूर्यवंशी, महेश मापारी, राजेंद्र मुथ्था, ज्ञानेश्वर जाधव, नेवासा शिवसेना भाजप प्रणित शहर विकास आघाडीचे गटनेते नगरसेवक महेश लोखंडे, क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे गटनेते नगरसेवक जितेंद्र कु-हे, नगरसेवक निरंजन डहाळे, कृष्णा परदेशी, संदीप सरकाळे, अनिल शिंदे, अंकुश म्हस्के, संभाजी धोत्रे, स्वप्नील मापारी, असिफभाई पठाण, डॉ.राहुल चव्हाण, मुक्तार शेख, दिनेश व्यवहारे, अनिल पवार, राजेंद्र परदेशी, अँड. प्रदीप वाखुरे, वीज वितरण कंपनीचे माजी अभियंता गोरे,रणजित सोनवणे, किशोर गारुळे, मुक्तारभाई जवई, संजय थोरात, गोरख घुले यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर शिवसेनेचे तालुका विधानसभा प्रमुख भाऊसाहेब वाघ यांनी उपस्थितांचे आभार मानले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

