
पत्रकारांकडून समाज हिताला प्राधान्य देऊन समाज व प्रशासनाला जागवण्याचे काम – महंत उद्धवजी महाराज
नेवासा – नेवासा येथे नेवासा प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.समाज व प्रशासनाला जागवण्याचे काम पत्रकारांकडून होत असते,नेवासा प्रेस क्लबचे सदस्य समाज हिताचे प्रश्न वेळोवेळी उचलून धरत टीका टिपण्णी न करता समाज हिताला प्राधान्य देतात असे उदगार सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत हभप उद्धवजी महाराज मंडलिक यांनी काढले.

नेवासा प्रेस क्लबच्या पत्रकार दिन व पुरस्कार समारंभ कार्यक्रमात हभप उद्धवजी महाराज मंडलिक हे अध्यक्षस्थावरून बोलत होते.आमदार विठ्ठलराव लंघे पाटील व जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.याशिवाय स्थानिक पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय लखवाल, पोलीस निरीक्षक महेश पाटील,नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले हे व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष सुधीर चव्हाण यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून उपस्थित मान्यवर अतिथींचा परिचय करून दिला.प्रेस क्लबचे संस्थापक मार्गदर्शक गुरुप्रसाद देशपांडे यांनी प्रास्ताविक करत प्रेस क्लबने केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेतला.यावेळी जेष्ठ पत्रकार अशोक डहाळे यांना पत्रकारीता कार्य गौरव तसेच सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट केलेल्या कार्याबद्दल डॉ.निलेश लोखंडे यांना तर आदर्श शिक्षक विक्रम गोसावी यांना सुविचार लेखनाच्या सातत्याबद्दल समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.

पत्रकारांना मार्गदर्शन करतांना जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी नेवासा आणि नगर जिल्ह्यातील पत्रकारितेचा इतिहास सांगत आधुनिक डिजिटल लायझेशनच्या जगात पत्रकारिता करताना कोणती कौशल्ये आत्मसात करावी आणि कोणती साधन सूचिता पाळावी याबद्दल मौलिक मार्गदर्शन केले.
प्रमुख भाषणामध्ये आमदार विठ्ठलराव लंघे यांनी पत्रकारांच्या मुळ प्रश्नांना हात घालीत पत्रकार भवनाच्या उभारणीसाठी सर्व प्रकारचा पाठपुरावा करू तसेच पुढील वर्षांपासून तालुक्यातील सर्वच पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी भव्य पत्रकार दिन साजरा करण्यासाठी पुढाकार घेऊ असे जाहीर केले.तालुक्याच्या विकासासाठी सर्वच पत्रकारांच्या मार्गदर्शनाची गरज आहे कारण पत्रकार हा सर्व ठिकाणी केंद्रबिंदू असलेला समाज घटक असल्याने विरोधी पक्षांसह सर्वांना बरोबर घेऊन नेवासा तालुक्याचा विकास साधला जाईल असे आश्वासन दिले.

यावेळी झालेल्या पत्रकार दिन कार्यक्रमाला सतीश मुळे सर,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली पेचे,पंचायत समितीचे माजी सभापती किशोर जोजार,अँड.काका गायके,नगरसेवक अँड.संजय सुखदान,माजी नगराध्यक्ष सतीश पिंपळे,कृष्णा डहाळे, अँड.सादिक शिलेदार, कल्याणराव उभेदळ,भरतकुमार उदावंत,अशोकराव आठरे,बालेंद्र पोतदार,किशोर गारुळे, राजेंद्र मुथ्था,संजय गायकवाड,आबासाहेब शिरसाठ, नगरसेवक महेश लोखंडे, जितेंद्र कु-हे,डॉ.राहुल चव्हाण, निरंजन डहाळे,असिफ पठाण,अंकुश म्हस्के,जालिंदर गवळी, संभाजी धोत्रे, संदीप सरकाळे,कृष्णा परदेशी, स्वप्नील मापारी,अनिल पवार, डॉ.मनिषा वाघ, माजी नगरसेविका डॉ.निर्मला सांगळे,अर्चना फिरोदिया,नंदिनी सोनवणे,भाऊसाहेब येवले,शिवसेना महिला आघाडीच्या शोभाताई आलवणे,शिक्षक अरविंद घोडके,संतोष भांबरे, उमाकांत कंक,प्रकाश गुजराथी,अंबादास लष्करे, नाथाभाऊ शिंदे,मुख्याध्यापक विश्वनाथ नानेकर, बाळासाहेब सोनवणे, अँड.फरदिन पठाण,गणेश झगरे, सलीम सय्यद,शांतवन खंडागळे,बादल परदेशी, निखिल जोशी,इम्रान दारुवाले यांच्यासह नेवासा तालुक्यातील विविध संस्थेचे पदाधिकारी व हितचिंतक तसेच तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षक संजय आघाडे यांनी सूत्रसंचालन केले तर नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन गायकवाड यांनी आभार मानले

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

